शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विद्यापीठ : प्रशासनाचा दावा, परीक्षा सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2020 22:10 IST

Nagpur University, Exam राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांमधील मोठा टप्पा सोमवारपासून सुरू झाला आहे. मंगळवारी विद्यार्थ्याना काही प्रमाणात समस्यांचा सामना करावा लागला. मात्र ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली त्या सर्वांची उत्तरे विद्यापीठाला प्राप्त झाली असल्याचा दावा कुलगुरू डॉ.सुभाष चौधरी यांनी केला आहे.

ठळक मुद्देप्रश्नपत्रिकेच्या भाषेमुळे विद्यार्थी संभ्रमित, काही समस्या कायम

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांमधील मोठा टप्पा सोमवारपासून सुरू झाला आहे. मंगळवारी विद्यार्थ्याना काही प्रमाणात समस्यांचा सामना करावा लागला. मात्र ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली त्या सर्वांची उत्तरे विद्यापीठाला प्राप्त झाली असल्याचा दावा कुलगुरू डॉ.सुभाष चौधरी यांनी केला आहे.

मंगळवारी दुसऱ्या सत्रात ‘लॉगिन’ होण्यासाठी उशीर लागत होता. अखेर काही वेळाच्या प्रतिक्षेनंतर विद्यार्थ्यांची प्रश्नपत्रिका उघडली. बीए-राज्यशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांना भाषेचा प्रश्न जाणवला. मराठी भाषेच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेत प्रश्न दिसत होते. सोबतच काही विद्यार्थ्यांना ‘सबमिट’ करण्यासाठीदेखील प्रतीक्षा करावी लागली.दरम्यान, प्रशासनाने काही लहान समस्या सोडल्या तर परीक्षा सुरळीत सुरू असल्याचा दावा केला आहे. मंगळवारी ९ हजार ७४५ विद्यार्थी परीक्षा देणे अपेक्षित होते. त्यापैकी ९ हजार १३५ म्हणजेच ९३.७५ टक्के विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, अशी माहिती कुलगुरूंनी दिली.

‘सोशल मीडिया’वरील अफवांवर विश्वास नकोपरीक्षा पूर्णत: अयशस्वी ठरत असल्याच्या ‘सोशल मीडिया’वर अफवा पसरल्या आहेत. मात्र या अफवांवर विश्वास ठेवण्यात येऊ नये. विद्यार्थ्यांनी पेपर पूर्ण झाल्यानंतर एकदा ‘सबमिट’साठी ‘क्लिक’ केले की सर्व उत्तरे विद्यापीठाच्या ‘सर्व्हर’वर जमा होत आहेत. आतापर्यंत १०० टक्के उत्तरे विद्यापीठाला प्राप्त झाली आहेत, असे डॉ.सुभाष चौधरी यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठexamपरीक्षा