शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

नागपूर विद्यापीठ : ३६ महाविद्यालयांचे संलग्नीकरण रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 23:09 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने नियमांचे पालन न करणाऱ्या ३६ महाविद्यालयांना धक्का दिला आहे. या महाविद्यालयांचे संलग्नीकरण २०१९-२० पासून रद्द करण्यात आले आहे. महाविद्यालयांमध्ये संबंधित अभ्यासक्रमांसाठी नियमित शिक्षक, सुविधा नसणे, संलग्नीकरणासाठी अर्ज न करणे तसेच ‘एलईसी’ची (लोकल इन्क्वायरी कमिटी) प्रक्रिया न राबविल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊ नये असे सांगत विद्यापीठाने यांची यादीच संकेतस्थळावर जाहीर केली आहे. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे विद्यापीठाने ३६ पैकी अवघ्या २८ महाविद्यालयांचीच नावे ‘अपलोड’ केली आहेत. उर्वरित नावे का सार्वजनिक करण्यात आली नाहीत, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

ठळक मुद्देसंकेतस्थळावर मात्र २८ महाविद्यालयांचीच यादी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने नियमांचे पालन न करणाऱ्या ३६ महाविद्यालयांना धक्का दिला आहे. या महाविद्यालयांचे संलग्नीकरण २०१९-२० पासून रद्द करण्यात आले आहे. महाविद्यालयांमध्ये संबंधित अभ्यासक्रमांसाठी नियमित शिक्षक, सुविधा नसणे, संलग्नीकरणासाठी अर्ज न करणे तसेच ‘एलईसी’ची (लोकल इन्क्वायरी कमिटी) प्रक्रिया न राबविल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊ नये असे सांगत विद्यापीठाने यांची यादीच संकेतस्थळावर जाहीर केली आहे. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे विद्यापीठाने ३६ पैकी अवघ्या २८ महाविद्यालयांचीच नावे ‘अपलोड’ केली आहेत. उर्वरित नावे का सार्वजनिक करण्यात आली नाहीत, हा प्रश्न उपस्थित होत आहे.विविध कारणांनी विद्यापीठाने १७ मे रोजी १२९ महाविद्यालयांतील विविध अभ्यासक्रमांवर प्रवेशबंदी लावली. त्यानंतर १२ दिवसांनी आणखी तीन महाविद्यालयांतील प्रथम वर्षाचे प्रवेश गोठविण्यात आले होते. नागपूर विद्यापीठात एकूण संलग्नित महाविद्यालयांची संख्या ५८४ इतकी आहे. यातील १३२ महाविद्यालयांतील विविध अभ्यासक्रमांत विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार नाही असे त्यावेळी विद्यापीठाने स्पष्ट केले होते. यानंतर काही महाविद्यालयांनी अटींचे पालन केले व त्यांच्यावरील बंदी उठविण्यात आली.मात्र ३६ महाविद्यालयांनी विद्यापीठाशी कुठलाही संपर्क ठेवला नाही. बहुतांश महाविद्यालयांनी गेल्या तीन वर्षांपासून विद्यापीठासोबत कुठलाही पत्रव्यवहार केलेला नाही. विद्यापीठाने महाविद्यालयांना वारंवार संधी दिली. मात्र तरीदेखील काहीच सुधारणा न झाल्याने १० जून रोजी विद्या परिषदेने घेतलेल्या निर्णयानुसार या महाविद्यालयांचे संलग्नीकरणच रद्द करण्यात आले आहे. मागील वर्षी ६ डिसेंबर रोजी विद्यापीठाने ५८ महाविद्यालयांचे संलग्नीकरण रद्द केले होते.प्रवेश घेतल्यास विद्यार्थी जबाबदार३६ महाविद्यालयांचा विद्यापीठाशी कुठलाही संबंध राहणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी तेथे प्रवेश न घेण्याची खबरदारी बाळगावी, असे आवाहन विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे. जर कुणी येथे प्रवेश घेतला तरी सर्वस्वी जबाबदारी त्याचीच असेल असे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.विद्यापीठाकडून लंपडाव?विद्यापीठाने जारी केलेल्या अधिसूचनेमध्ये ३६ महाविद्यालयांचे संलग्नीकरण रद्द करण्यात येत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र यादी देताना २८ महाविद्यालयांचीच देण्यात आली आहे. २२ व्या महाविद्यालयानंतर थेट ३१ व्या महाविद्यालयाचे नाव देण्यात आले आहे. असा प्रकार का करण्यात आला आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.महाविद्यालयांची नावेनागपूर जिल्हा

  • रमेश धवड शारीरिक शिक्षण महाविद्यालय, राजीवनगर
  • एम.ए.टी.ई.एस कॉलेज, अमरावती मार्ग
  • नितीन राऊत महाविद्यालय, पांजरा, कोराडी मार्ग
  • शिंदे महिला अध्यापक महाविद्यालय, काटोल
  • इंदिरा गांधी कॉलेज ऑफ एज्युकेशन, बुटीबोरी
  • प्रतिकान कॉलेज ऑफ स्पेशल एज्युकेशन फॉर बी.एड.,बुटीबोरी
  • महात्मा फुले वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, रेशीमबाग
  • माईंडस्पेस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सदर
  • राणी लक्ष्मीबाई शारीरिक शिक्षण महाविद्यालय, सावरगाव, नरखेड
  • यशोदा भोयर कॉलेज ऑफ एज्युकेशन, चाफेगडी, कुही
  • सागर कॉलेज ऑफ कॉमर्स अ‍ॅन्ड कॉम्प्युटर एज्युकेशन, भिवापूर
  • सेठ सुभाषबाबू गोवर्धनदास पालीवार अध्यापक महाविद्यालय, पारशिवनी
  • विद्यादीप कॉलेज, लोहिया ग्राऊंड, कामठी
  • विद्याविहार कॉलेज, ऑरेंज प्लाझा, काटोल
  • नागोरावजी मोवाडे कला महाविद्यालय, नांदागोमुख, सावनेर
  • गुरुकूल महाविद्यालय, भिवापूर
  • वच्छलाबाई मामुलकर कॉलेज ऑफ लायब्ररी सायन्स, उमरेड
  • रियल इन्स्टिट्यूट ऑफ प्रोफेशनल स्टडीज्, वर्धा मार्ग
  • गुरुकूल कॉलेज, धापेवाडा, कळमेश्वर

भंडारा जिल्हा

  • वैनगंगा इन्स्टिट्यूट ऑफ अ‍ॅडव्हान्स स्टडीज, साकोली
  • मनोहरभाई पटेल कॉलेज ऑफ एज्युकेशन, भंडारा
  • अरुण मोटघरे मास्टर ऑफ एज्युकेशन, कोसरा
  • नर्मदाबाई ठवकर कॉलेज ऑफ कॉमर्स अ‍ॅन्ड मॅनेजमेन्ट, भंडारा

वर्धा

  • प्रमोदबाबू शेंडे कला व वाणिज्य महाविद्यालय, सिंदी रेल्वे, सेलू
  • अग्निहोत्री कॉलेज ऑफ एज्युकेशन, बापूजी वाडी
  • इंदुमती वानखेडे शिक्षण महाविद्यालय, सेवाग्राम
  • नारायणराव वाघ आर्टस् अ‍ॅन्ड कॉम्प्युटर सायन्स कॉलेज, पिंपळखुटा, आर्वी
  • सुभेदार रामजी आंबेडकर शारीरिक शिक्षण महाविद्यालय, हिंगणघाट

 

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठcollegeमहाविद्यालय