शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात ‘आपली बस’च्या तिकिटाचे पैसे कंडक्टरच्या खिशात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 00:01 IST

‘आपली बस’ शहर बसचा स्मार्टकार्ड घोटाळा गाजत असतानाच मंगळवारी परिवहन समिती सभापतींनी केलेल्या तपासणी दौऱ्यात प्रवाशांना तिकीट न देता कंडक्टर तिकिटाची रक्कम जमा करून आपल्या खिशात घालत असल्याचा गैरव्यवहार उघडकीस आला. यातील दोषी दोन कंडक्टरला निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले़

ठळक मुद्देपरिवहन सभापतींनी केली तपासणी : दोन कंडक्टर निलंबित

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘आपली बस’ शहर बसचा स्मार्टकार्ड घोटाळा गाजत असतानाच मंगळवारी परिवहन समिती सभापतींनी केलेल्या तपासणी दौऱ्यात प्रवाशांना तिकीट न देता कंडक्टर तिकिटाची रक्कम जमा करून आपल्या खिशात घालत असल्याचा गैरव्यवहार उघडकीस आला. यातील दोषी दोन कंडक्टरला निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले़शहर बसमध्ये तिकिटांचा गैरव्यवहार होत असून बसचे चालक व कंडक्टर बसस्थानकावरून बसमध्ये बसलेल्या प्रवाशांना त्याचवेळी तिकीट देत नसल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार मंगळवारी सकाळी परिवहन समितीचे सभापती बंटी कुकडे, प्रशासकीय अधिकारी रवींद्र पागे, निरीक्षक सुनील शुक्ला व अतुल आकरे, गिरीश महाजन व सुरेश सोयाम आदींनी विविध १० मार्गावरील शहर बसची तपासणी केली. पारडी नाल्याजवळ एमएच ३१-सी२-६१८१ या भिलगाव ते पारडी बसची तपासणी केली असता, या बसमध्ये २६ प्रवासी होते. यातील एकाच प्रवाशाकडे तिकीट होते. तसेच एका मिडीबसची तपासणी केली असता, बसमधील १५ प्रवाशांपैकी २ प्रवाशांकडे तिकीट असल्याचे निदर्शनास आले. या दोन्ही बसच्या कंडक्टर पंकज घोरपडे व आशिष दांडेकर यांना तत्काळ निलंबित करण्याचे आदेश बंटी कुकडे यांनी परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. तरोडी ते भांडेवाडी, रेल्वेस्टेशन ते पारडी, एचबी टाऊन ते वर्धमानगर, अयाचित मंदिर-महाल ते नरसिंग टॉकीज अशा मार्गावरील बसेसची तपासणी करण्यात आली.प्रवाशांना वेळेवर तिकीट दिले जाते की नाही. बसचालक बसथांब्यावरून परवानगीनेच बस सोडतात की नाही, यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी डीआयएसएमटीएस(डिम्ट्स) आॅपरेटरची आहे. परंतु आॅपरेटरकडून कोणत्याही स्वरूपाची कारवाई केली जात नाही.बसमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज आणि २० फेब्रुवारी २०१८ ते २० मार्च २०१८ या एक महिन्याच्या कालावधीचा प्रत्येक बसचा अहवालही सादर करण्यास डिम्ट्सला निर्देश दिले आहे़दरम्यान, शहर बससेवा चालविण्यासाठी तीन आॅपरेटर नियुक्त करण्यात आले आहेत़ शहरातील स्टार बस या तिन्ही आॅपरेटरला विभागून देण्यात असून ग्रीन बस स्कॅनिया कंपनी चालवीत आहे़ शहरात सध्या ३७० बसेस धावत आहेत़ सर्व बसचे व्यवस्थापन व नियंत्रणाची जबाबदारी डिम्ट्स या आॅपरेटरकडे सोपविण्यात आली आहे़ ही कंपनी कामात हयगय करीत असल्याचा आरोप होत आहे़

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाBus Driverबसचालक