शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
3
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
4
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
5
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
6
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
7
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
8
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
9
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
10
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
11
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
12
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
13
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
14
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
15
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
16
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
17
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
18
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
19
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
20
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
Daily Top 2Weekly Top 5

वर्धेच्या स्ट्रॉबेरीला 'रिचिंग टू अनरीच्ड'चे बळ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे अभियान

By आनंद डेकाटे | Updated: May 20, 2024 21:51 IST

Nagpur News: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडून शताब्दी महोत्सवी वर्षानिमित्ताने राबविल्या जात असलेल्या 'रिचिंग टू अनरीच्ड' अभियानाचे बळ वर्धा जिल्ह्यातून महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या स्ट्रॉबेरी उत्पादन व प्रक्रिया उद्योगाला मिळणार आहे.

- आनंद डेकाटे नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडून शताब्दी महोत्सवी वर्षानिमित्ताने राबविल्या जात असलेल्या 'रिचिंग टू अनरीच्ड' अभियानाचे बळ वर्धा जिल्ह्यातून महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या स्ट्रॉबेरी उत्पादन व प्रक्रिया उद्योगाला मिळणार आहे. स्ट्रॉबेरी उत्पादन व प्रक्रिया उद्योगासह स्थानिक नैसर्गिक संसाधनांचा वापर करून शाश्वत विकासाचा मार्ग शोधण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात वर्धेचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांची सकारात्मक चर्चा झाली.

भंडारा, गोंदिया नंतर आता वर्धा जिल्ह्यात स्थानिक कृषी उत्पादनापासून प्रक्रिया उद्योग निर्मितीला बळ देत नाविन्यपूर्ण पद्धतीने सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने विद्यापीठाने पाऊल उचलले आहे. वर्धा जिल्ह्याचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून स्थानिक स्तरावर उपलब्ध असलेल्या नैसर्गिक संसाधनांचा वापर करून रोजगार निर्मिती व्हावी या दृष्टीने विद्यापीठाकडून कौशल्य विकासावर भर दिला जात आहे. कौशल्य प्रशिक्षणानंतर रोजगार/उद्योग स्थापण्याकरिता आवश्यक सहायता आणि सुविधा या अभियान अंतर्गत विद्यार्थ्यांना दिल्या जाणार आहे. वर्धा जिल्ह्यातील स्थानिक नैसर्गिक संसाधनांचा वापर करून विविध प्रकल्प 'रिचिंग टू अनरीच्ड' अभियान राबविणबाबत ही बैठक घेण्यात आली.

बैठकीला विद्यापीठाचे आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखा अधिष्ठाता व प्रकल्प अधिकारी डॉ. प्रशांत कडू, जिल्हा समन्वयक डॉ. संजय कवीश्वर, जिल्हा नियोजन अधिकारी अनिरुद्ध राजूरवार, डॉ. सुरेश रैना, संचालक डॉ. सुरेश मसराम, बापूराव देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालयाचे डॉ. गिरीश ठाकरे, यशवंत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रविंद्र बेले उपस्थित होते.

स्ट्रॉबेरी प्रकल्पासह वॉटर कप गटांची मदतजिल्ह्यात नव्यानेच घेतल्या जात असलेल्या स्ट्रॉबेरीचे नविन्यपूर्ण वितरण आणि प्रक्रिया उद्योग कसा निर्माण करता येईल यावर बैठकीत चर्चा करण्यात आली. सोबतच पाणी फाउंडेशनच्या 'फार्मर्स कप' स्पर्धेसाठी तयार असलेल्या जिल्ह्यातील अंदाजे २ हजार गटांसोबत मिळून अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचप्रमाणे आर्वी उपसा सिंचन प्रकल्प निर्मितीत स्थानिक विद्यार्थ्यांचा कौशल्य वाढीच्या दृष्टीने सहभाग कसा करून घेता येईल, याबाबत चर्चा करण्यात आली.

टॅग्स :nagpurनागपूर