शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात  ऑटोचालकांच्या संपाचा विद्यार्थ्यांना फटका 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 00:09 IST

केंद्रीय कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या देशव्यापी संपाला तीन सीटर ऑटोरिक्षा चालक संयुक्त संघर्ष समितीने समर्थन देत मंगळवारी ऑटोरिक्षा बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. परंतु याला संमिश्र प्रतिसाद मिळाला. प्रवासी वाहतुकीवर याचा फारसा प्रभाव पडला नसला तरी ऑटोरिक्षांमधून शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा फटका बसला. विद्यार्थ्यांना शाळेत सोडण्याची जबाबदारी पालकांवर आली होती.

ठळक मुद्देऑटोरिक्षा चालक संयुक्त संघर्ष समितीचे संपाला समर्थन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्रीय कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या देशव्यापी संपाला तीन सीटर ऑटोरिक्षा चालक संयुक्त संघर्ष समितीने समर्थन देत मंगळवारी ऑटोरिक्षा बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. परंतु याला संमिश्र प्रतिसाद मिळाला. प्रवासी वाहतुकीवर याचा फारसा प्रभाव पडला नसला तरी ऑटोरिक्षांमधून शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा फटका बसला. विद्यार्थ्यांना शाळेत सोडण्याची जबाबदारी पालकांवर आली होती.ऑटोरिक्षा चालकांनी या बंदमध्ये ऑटो चालकांसाठी समाज कल्याण बोर्डाची स्थापना करण्याच्या मागणीसह इतरही मागण्या रेटून धरल्या. तीन सीटर ऑटोरिक्षा चालक संयुक्त संघर्ष समितीचे हरिश्चंद्र पवार यांनी ‘लोकमत’ला सांगितले, संपात ८० टक्के ऑटोचालक सहभागी झाले होते. संविधान चौकात दुपारी झालेल्या जाहीर सभेत सहभागीही झाले होते. शहरातील प्रवासी वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती. प्रत्यक्षात मात्र, संपामधून इतर ऑटोचालक संघटना दूर राहिल्याने प्रवासी वाहतुकीवर फारसा प्रभाव पडला नाही. काही प्रमाणात शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक प्रभावित झाली होती.पालकांची तारांबळविद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या ऑटोचालकांनी संपाची माहिती एक दिवसापूर्वीच पालकांना दिली होती. यामुळे काही पालकांनी तात्पुरती उपाययोजना केली होती, परंतु ज्या पालकांनी याकडे दुर्लक्ष केले, त्यांची तारांबळ उडाली. शाळेची वेळ होऊनही ऑटोचालक आला नसल्याने पालकांना विद्यार्थ्यांना शाळेत सोडावे लागले. आज अनेक शाळांसमोर उभ्या राहणाऱ्या ऑटोरिक्षांच्या ठिकाणी पालकांनी गर्दी केली होती.

टॅग्स :auto rickshawऑटो रिक्षाStrikeसंप