शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
6
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
7
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
8
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
9
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
10
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
11
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
12
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
13
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
14
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
15
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
16
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
17
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
18
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
19
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
20
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'

नागपुरात लागले ४० हजार एलईडी, मात्र ऊर्जा बचत किती?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 12:24 PM

४० हजार म्हणजेच जवळपास ३६ टक्के एलईडी लावण्यात आले. परंतु नेमकी किती बचत होत आहे. याची आकडेवारी विद्युत विभागाकडे अजूनही उपलब्ध नसल्याने ऊर्जा बचतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

ठळक मुद्दे४७० कोटींचा प्रकल्पमनपाच्या विद्युत विभागाकडे माहिती नाही

गणेश हूड।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेला पथदिव्यांची देखभाल व दुरुस्ती तसेच वीज बिलावर मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो. या खर्चासोबतच ऊर्जा बचत व्हावी, या हेतूने सोडियम दिव्याऐवजी शहरात १ लाख ३८ हजार हजार एलईडी दिवे लावण्याचा निर्णय चार वर्षापूर्वी घेण्यात आला. यातील ४० हजार म्हणजेच जवळपास ३६ टक्के एलईडी लावण्यात आले. त्यानंतर प्रशासनाच्या दाव्यानुसार ऊर्जा बचत होऊन वीज बिलात कपात अपेक्षित होती. परंतु नेमकी किती बचत होत आहे. याची आकडेवारी विद्युत विभागाकडे अजूनही उपलब्ध नसल्याने ऊर्जा बचतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.शहरातील पददिवे बदलवून एलईडी लावल्यास ६० ते ७० टक्के ऊर्जा बचत होणार आहे. ९९ महिन्यात एलईडी दिवे लावल्यानंतर पुढील ९ वर्षात प्रकल्पावरील संपूर्ण खर्चाची परतफेड होऊन ३५० कोटींची बचत होणार होईल, असा दावा विद्युत विभागाकडून केला जात आहे. त्यानुसार ४० हजार एलईडी लावल्यानंतर वीज बिलात ३५ ते ३६ टक्के कपात अपेक्षित होती. मात्र नेमकी किती बचत होत आहे याची आकडेवारी विभागाकडे नाही. वास्तविक ४७० कोटींचा हा प्रकल्प असून कंत्राटदारांना ५४ हप्त्यांत २७० कोटी द्यायचे आहेत. त्यामुळे प्रकल्प राबविताना ज्या भागात एलईडी लावण्यात आले अशा मार्गावरील पथदिव्यांचे आधी येणारे वीज बिल आताचे बिल याची माहिती तुलनात्मक माहिती अपेक्षित होती. विभागाकडे यासंदर्भात माहिती नसल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.डिसेंबर २०१८पर्यंत शहरात आणखी ९८ हजार एलईडी मे २०१९ पर्यंत लावण्यात येणार आहेत. यातून ७० टक्के वीज बचतीचा दावा करण्यात आला आहे. डिसेंबर २०१८ पर्यंत दिवे फिटिंगचे काम होणे अपेक्षित होते. मात्र एलईडी दिव्यासंदर्भातील प्रकरण न्यायप्रविष्ट होते. यामुळे काम ठप्प होते.आता याचिका निकाली निघाल्याने उर्वरित दिवे लावण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. एलईडी दिवे लावताना ५९ कोटींचा मूलभूत बळकटीकरणाचा प्रकल्पही सोबतच राबविला जाणार आहे. यात खांब उभारणे व केबल टाकण्याचे काम सोबतच केले जात आहे.

४७० कोटींचा प्रकल्पमहापालिकेने २०१४ मध्ये शहरातील विद्यमान पथदिवे बदलवून एलईडी पथदिवे लावण्याचा निर्णय घेतला होता.या प्रकल्पांवर ४७० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. यात नादुरुस्त केबल बदलणे, तुटलेल्या खांबाच्या ठिकाणी नवीन खांब बसविणे, फिडबॅक देणारे नवीन फिडर बसविणे आदी कामांचा समावेश आहे. मार्च २०१८ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र विविध अडचणीमुळे प्रकल्प रखडला. ४०हजार एलईडी लावण्यात आले. आणखी ९८ हजार एलईडी लावण्याचे शिल्लक आहे. कामाची गती विचारात घेता मे २०१९ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होईल की नाही, याची शाश्वती नाही.

झोननिहाय कंत्राट तरीही विलंब२०१४ मध्ये जे. के. सोल्युशन इंक कंपनीला निर्धारित कालावधीत एलईडी दिवे बसविण्यात अपयश आल्याने या कंपनीचे कंत्राट रद्द करण्यात आले. या कंपनीचा अनुभव विचारात घेता झोननिहाय एलईडी दिवे बसविण्याचे वेगवेगळ्या कंपन्यांना कंत्राट देण्यात आले. त्यानंतरही कामात अद्याप गती आलेली नाही.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका