शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

अवयवदानातही नागपूरकरांनी व्हावे ‘स्मार्ट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 01:35 IST

अवयव दान एक महादान आहे. मेंदू मृत व्यक्तीचे अवयवदान इतरांच्या आयुष्यातील आशेचा किरण ठरू शकते.

ठळक मुद्देमहापौर जिचकार यांचे आवाहन : ‘मरावे परी देहरुपी उरावे’ रॅलीतून केली जनजागृती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अवयव दान एक महादान आहे. मेंदू मृत व्यक्तीचे अवयवदान इतरांच्या आयुष्यातील आशेचा किरण ठरू शकते. अवयवदान हीच काळाच गरज आहे. हाच विचार समोर ठेवून मृत्यूनंतर अवयवांचे दान करण्यात नागपूरकरांनी ‘स्मार्ट’ व्हावे, असे आवाहन महापौर नंदा जिचकार यांनी येथे केले.जागतिक अवयवदान दिन रविवारी दीक्षाभूमी येथील डॉ. आंबेडकर सभागृहात साजरा करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. या प्रसंगी महापौर जिचकार यांनी अर्ज भरून अवयव दानाचा संकल्प केला. इंडियन मेडिकल असोसिएशन, नागपूर शाखेसह जिल्हा प्रशासन, महानगरपालिका, नागपूर रोटरी क्लब, अकादमी आॅफ मेडिकल सायन्स, जनआक्रोश, जेसिस क्लब आॅफ नागपूर, मोहन फाऊंडेशन, विभागीय अवयवदान समिती, बाहो रुग्णालय आदी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने अवयवदान जनजागृती रॅली काढण्यात आली. जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी या रॅलीला हिरवी झेंडी दाखवली. रॅलीत ‘आयएमए’च्या अध्यक्ष डॉ. वैशाली खंडाईत, डॉ. वाय एस देशपांडे, डॉ. रवी चव्हाण, डॉ. समीर जहागीरदार, डॉ. प्रशांत राठी, डॉ. अनिल लद्दढ, रवी कासखेडीकर, डॉ. राजन, डॉ. अलका मुखर्जी, डॉ. शिवाणी बिंदये यांच्यासह वैद्यकीय विद्यार्थी, शहरातील डॉक्टर, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.रॅलीतून ‘मरावे परी देहरुपी उरावे’अशी घोषणा देत उपस्थितांचे लक्ष्य वेधले. रॅलीचा समारोप दीक्षाभूमी येथील सभागृहात झाला. यावेळी अवयवदान जागृतीवर माहिती सादर करण्यात आली. ग्रीन कॉरिडारसंदर्भात पोलीस निरीक्षक जयेश भांडारकर यांनी माहिती दिली. यावेळी वाहतूक विभागाचे पोलीस आयुक्त रवींद्र परदेसी, पोलीस निरीक्षक गिरीश तातोड (प्रशासन) उपस्थित होते.हृदय, यकृत प्रत्यारोपणही व्हावे : डॉ. वानखेडेविभागीय अवयवदान समितीचे सचिव डॉ. रवि वानखेडे म्हणाले, उपराजधानीत दरवर्षी पन्नासपेक्षा जास्त मूत्रपिंड प्रत्यारोपण होतात. याची संख्या वाढण्याची गरज आहे. सध्याच्या स्थितीत ६० हजार रुग्ण हृदय तर ८५ हजार रुग्ण यकृत प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत आहे. दात्यांची कमतरता एवढी आहे की, बरेच रुग्ण प्रतीक्षा करत असतानाच जीवाला मुकतात. परंतु आता ज्या पद्धतीने शहराची जबाबदारी वाढत आहे, त्यानुसार ह्दय आणि यकृत प्रत्यारोपण करणारी यंत्रणा उभारण्यासाठी शासनाने पुढाकार घेणे आवश्यक झाले आहे.