शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरकर म्हणतात,फाशीची शिक्षा आवश्यकच

By admin | Updated: September 4, 2015 02:54 IST

मृत्युदंडाची शिक्षा हवी की नको, याबाबत देशासोबतच जगभरात चर्चा सुरू आहेत.

नागपूर : मृत्युदंडाची शिक्षा हवी की नको, याबाबत देशासोबतच जगभरात चर्चा सुरू आहेत. नागपुरातदेखील याबाबत विविध मतं दिसून येत असली तरी बहुसंख्य लोक फाशीच्या शिक्षेच्या समर्थनार्थ असल्याची बाब समोर आली आहे. तिरपुडे समाजकार्य महाविद्यालयाने फाशीची शिक्षा हवी की नको, या विषयावर नागपूर शहरातील नागरिकांचे मत जाणून घेतले. या सर्वेक्षणानुसार ६८ टक्के नागरिकांनी फाशीची शिक्षा आवश्यक असल्याचे मत नोंदविले आहे.संपूर्ण जगभरात मृत्युदंड हा विषय विवादास्पद राहिलेला आहे. अनेक प्रमुख देशांमध्ये मृत्युदंडाच्या शिक्षेवर बंदी अणण्यात आली आहे. भारताच्या विधी आयोगाच्या समितीने दहशतवाद वगळता इतर बाबींसंदर्भात फाशीच्या शिक्षेची तरतूद रद्दबातल करण्याची शिफारस विधी व न्याय मंत्रालय तसेच सर्वोच्च न्यायालयाला केली. या पार्श्वभूमीवर महाविद्यालयातर्फे हे सर्वेक्षण करण्यात आले. १७ ते २४ आॅगस्ट या कालावधीत प्राचार्य डॉ. केशव पाटील यांच्या मार्गदर्शनात ४९ विद्यार्थी व १४ शिक्षक या प्रक्रियेत सहभागी झाले होते. फाशीची शिक्षा हवी की नको, कायम ठेवायची असल्यास त्यामागील कारणे आणि बंदी आणायची असल्यास त्यामागील कारणे, याबाबत नागरिकांना विचारणा करण्यात आली होती. या सर्वेक्षणानुसार ६८.४३ टक्के नागरिकांनी फाशीच्या शिक्षेचे समर्थन केले आहे. २५.७० टक्के नागरिक हे या शिक्षेच्या विरोधात असून, ५.८७ टक्के लोकांना नेमके मत मांडता आले नाही. (प्रतिनिधी)गुन्हेगारांवर जरब बसावीसमाजात घडणारे गुन्हे कमी व्हावेत व गुन्हेगारांमध्ये कायद्याची भीती निर्माण व्हावी, यासाठी फाशीची शिक्षा आवश्यक असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले. ३१.५६ लोकांना मात्र फाशीची शिक्षा नेमकी का हवी, याबाबत ठोस मत मांडता आले नाही. फाशीचा विरोध करणाऱ्यांपैकी ५० टक्के नागरिकांच्या मते, गुन्हेगाराला सुधारण्याची संधी दिली गेली पाहिजे, तर ३२.९५ टक्के नागरिकांनी फाशी ही हत्याच असल्याचे मत नोंदविले. १७.०५ टक्के नागरिकांनी कुठलेही मत व्यक्त केले नाही.