शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरकरांना ४३ अंशाचे चटके, अंगातून घामाच्या धारा; ‘मे’ची कसर जून महिन्यात

By निशांत वानखेडे | Updated: June 8, 2025 19:50 IST

ढगांमधून बरसते सूर्याची उष्णता : सायंकाळच्या सरींनी उकाडाच वाढवला

नागपूर : अख्ख्या मे महिन्यात दिवसाचे तापमान ४२ अंशाच्यावर गेले नाही. नवतप्यातही तापमान ४० अंशाच्या खालीच हाेते. पण आता सूर्यदेव मे महिन्याची कसर जूनमध्ये काढताे काय, असे वाटत आहे. रविवारी नागपूरचे तापमान तब्बल ३.५ अंशाने वाढून थेट ४३ अंशावर उसळले. त्यामुळे उकाड्यासाेबत उन्हाच्या चटक्यांनीही नागपूरकरांना हैरान केले.

रविवारी नागपूरसह विदर्भातील काही जिल्ह्यात वादळ वाऱ्यासह तुरळक ठिकाणी किरकाेळ पाऊस हाेण्याचा हवामान विभागाचा अंदाज हाेता. मात्र आकाशात हलके ढग असूनही सकाळपासून सूर्याचा पारा वाढल्याची स्थिती हाेती. आकाशातील हे ढग सूर्याची तीव्रता राेखू शकले नाही. सूर्याचा ताप जरा अधिकच वाढल्याचे जाणवत हाेते. उलट ढगांमधून पावसाऐवजी उष्णता बरसत असल्याची आणि उन्हाचे चटके अंगाला झाेंबत असल्याची जाणीव हाेत हाेती. तापमान थेट ४३ अंशावर गेले. महिनाभरापासून सरासरीच्या खाली असलेला पारा सरासरीच्या पुढे गेला आहे. त्यामुळे लाेकांच्या शरीरातून अक्षरश: घामाच्या धारा वाहत राहिल्या. रात्रीचे तापमानही वाढून २८.४ अंशावर गेले असल्याने रात्रीचा उकाडासुद्धा वाढला आहे. सायंकाळच्या ५ वाजताच्या दरम्यान ढगांचा रंग बदलला व वादळाची स्थिती निर्माण झाली आणि शिंताेडे उडविल्यासारखा पावसाचा शिरवा आला. मात्र या पावसाने गारवा देण्याऐवजी उकाडाच जास्त वाढविला.

विदर्भात ४३.६ अंशासह ब्रम्हपुरी सर्वाधिक तापले हाेते. त्याखालाेखाल चंद्रपूर ४२ व गाेंदिया ४२.१ अंशावर गेले. अकाेला, अमरावती, वर्धा, भंडारा येथे तापमान ४१ अंशावर उसळले आहे. केवळ बुलढाणा ३३.४ व वाशिम ३६.८ अंशासह सरासरीच्या खाली आहेत. गडचिराेलीच्या सीमेवर थांबलेला पाऊस अजुनही त्याच ठिकाणी थांबून आहे. हवामान विभागाने पुन्हा आठवडाभर उन्हाचा व उकाड्याचा त्रास सहन करावा लागेल, असा अंदाज व्यक्त केला आहे.