शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरला कोविशिल्डचे १,५३,२००, कोव्हॅक्सिनचे २०,४०० डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:15 IST

नागपूर : कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळत असल्याने राज्याच्या आरोग्य विभागाकडून आज नागपूर विभागाला ...

नागपूर : कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळत असल्याने राज्याच्या आरोग्य विभागाकडून आज नागपूर विभागाला कोविशिल्डचे २,७६,०००, तर कोव्हॅक्सिनचे १,१७,७६० डोस असे एकूण ३,९३,७६० डोस उपलब्ध झाले. विशेष म्हणजे, पहिल्यांदाच आरोग्य उपसंचालक कार्यालयाने सहा जिल्ह्यांच्या गरजेनुसार डोसचे वितरण केले. यात नागपूर जिल्ह्याच्या वाटेला कोविशिल्डचे १,५३,२००, तर कोव्हॅक्सिनचे २०,४०० डोस आले. सध्या जिल्ह्यात कोविशिल्डचे १,०३,०००, तर कोव्हॅक्सिनचे ६७,३६० डोस शिल्लक आहेत.

नागपूर जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून ९ ते १० हजार डोस लावले जात आहेत. लसीचा तुटवडा पडू नये म्हणून मंगळवारी वर्धा जिल्ह्यातून ‘कोव्हॅक्सिन’चे ७ हजार, तर नागपूर ग्रामीणकडून ‘कोविशिल्ड’चे ५ हजार डोस मागविण्यात आले होते. सोबतच राज्याच्या आरोग्य विभागाकडून अधिक लसीची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार आज दोन्ही लसीचे एकूण ३,९३,७६० डोस उपलब्ध झाले. आतापर्यंत या लसीचे वितरण पुणे येथून केले जात होते; परंतु काही जिल्ह्यांमध्ये लसीकरणाला कमी प्रतिसाद मिळत असताना लसीचा पुरवठा अधिक होत होता. यामुळे आता उपसंचालक आरोग्य विभागाने पुढाकार घेत लसीचे वितरण केले. त्यानुसार भंडारा जिल्ह्याला कोविशिल्डचे १९,८००, तर कोव्हॅक्सिनचे ३०,०००डोस मिळाले. सध्या या जिल्ह्यात कोवीशिल्डचे २,५६,२००, तर कोव्हॅक्सिनचे ८७,७६० डोस शिल्लक आहेत. गोंदिया जिल्ह्याला कोविशिल्डचे १८,०००, तर कोव्हॅक्सिनचे २५,०००डोस मिळाले. या जिल्ह्यात कोविशिल्डचे ८५,०००, तर कोव्हॅक्सिनचे ४२,३६० डोस शिल्लक आहेत. चंद्रपूर जिल्ह्याला कोविशिल्डचे ४५,०००, तर कोव्हॅक्सिनचे ४,८०० डोस मिळाले. या जिल्ह्यात कोविशिल्डचे ४०,०००, तर कोव्हॅक्सिनचे ३७,५६० डोस शिल्लक आहेत. वर्धा जिल्ह्याला कोविशिल्डचे ३०,०००, तर कोव्हॅक्सिनचे ५,०००डोस मिळाले. जिल्ह्यात कोविशिल्डचे १०,०००, तर कोव्हॅक्सिनचे ३२,५६० डोस शिल्लक आहेत. गडचिरोली जिल्ह्याला कोविशिल्डचे १०,०००, तर कोव्हॅक्सिनचे ५,००० डोस मिळाले. सध्या कोविशिल्डचे शून्य, तर कोव्हॅक्सिनचे २७,५६० डोस शिल्लक आहेत.