शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

ड्राय रनसाठी नागपूर सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:09 IST

नागपूर : कोरोना प्रतिबंधक लसीच्या आपत्कालीन वापरासाठी शुक्रवारी कोविशिल्ड लसीला परवानगी मिळाली असताना शनिवारी लसीकरणाचा ‘ड्राय रन’ म्हणजे रंगीत ...

नागपूर : कोरोना प्रतिबंधक लसीच्या आपत्कालीन वापरासाठी शुक्रवारी कोविशिल्ड लसीला परवानगी मिळाली असताना शनिवारी लसीकरणाचा ‘ड्राय रन’ म्हणजे रंगीत तालमीसाठी नागपूर सज्ज झाले आहे. महानगरपालिकेचे केटीनगर येथील आरोग्य केंद्र, डागा स्मृती शासकीय महिला रुग्णालय व कामठी रुग्णालयात प्रत्येकी २५ असे एकूण ७५ जणांचा समावेश केला जाणार आहे. यात लस न देता लसीकरणाची संपूर्ण प्रक्रिया राबविली जाणार आहे.

‘ड्राय रन’ संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी पत्रपरिषद घेतली. ते म्हणाले, लसीकरणासाठी पहिल्या टप्प्यात ३१ हजार हेल्थ केअर वर्करना लस दिला जाणार आहे. यांची ‘को-विन’ अ‍ॅपवर नोंदणी झाली आहे. यात शासकीयसह खासगी रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांचा समावेश असणार आहे. लसीकरणाची पूर्वतयारी म्हणून महानगरपालिकेच्या केटीनगर येथील आरोग्य केंद्रात ‘ड्राय रन’ केले जाणार आहे. यात २५ जणांचा समावेश करण्यात आले आहे. त्यांची ओळख पटविण्यापासून, पाेर्टलवर त्यांची माहिती अपलोड करणे, लस दिल्यानंतरची नोंद घेणे व पुढील ३० मिनिटे निरीक्षण करणे, अशी रंगीत तालीम होणार आहे. यात येणाऱ्या तांत्रिक व इतरही अडचणींची माहिती घेऊन प्रत्यक्ष लसीकरणाच्यावेळी ती सोडविण्याचा प्रयत्नांच्या उद्देशाने ही तालीम घेतली जात आहे, असेही ते म्हणाले.

विशेष म्हणजे, ‘ड्राय रन’साठी मनपाने तयारीची माहिती दिली, परंतु आरोग्य विभागाने डागा रुग्णालय व कामठी रुग्णालयात होणाऱ्या पूर्वतयारीची माहिती दिली नाही. केवळ प्रत्येक केंद्रावर २५ जणांचा समावेश करण्यात आला एवढीच माहिती दिली.

-५६ सेंटरवर दिली जाणार लस

राधाकृष्णन बी. म्हणाले, कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची पूर्ण तयारी झाली आहे. यासाठी लागणारे प्रशिक्षण देण्यात आले आहेत. शहरात ५६ सेंटरवर लसीकरण होईल. लस ठेवण्यासाठी डिप फ्रिझर, ‘आयएलआर बॉक्स’चा उपयोग केला जाईल.

-असे असणार ‘ड्राय रन’

:सकाळी ९ ते ११ वाजताच्या दरम्यान ‘ड्राय रन’ होईल.

:२५ जणांमधून प्रत्येकाला ठरलेल्या वेळेत बोलाविले जाईल.

: केंद्रावर ओळख पटविण्यासाठी आधार कार्डची मदत घेतली जाईल.

: ओळख पटल्यावर डमी पोर्टलवर संबंधितांची नोंद घेतली जाईल.

: लसीचा डोज देण्याच्या कक्षात पाठविले जाईल.

: लस मिळाल्याच्या माहितीची नोंद घेतली जाईल.

: पुढील ३० मिनिटे आरोग्य कक्षात बसवून ठेवले जाईल.