शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर : अल्पवयीन मुलीसह दोघींवर बलात्कार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 23:47 IST

एका १६ वर्षीय विद्यार्थीनीसह दोघींवर बलात्कार केल्याप्रकरणी आरोपींविरुद्ध सदर आणि मानकापूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. 

नागपूर, दि. 10 - सदरमधील एका १६ वर्षीय विद्यार्थीनीसह दोघींवर बलात्कार केल्याप्रकरणी आरोपींविरुद्ध सदर आणि मानकापूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. 

आरोपी अश्विन मधुकरराव डोंगरे (वय २०) याने सदरमधील त्याच्याच वस्तीत राहणा-या  मैत्रीणीला मित्राचे आॅफिस दाखवतो, असे सांगून १ आॅगस्टला रात्री ७.३० वाजता  उत्कर्ष निर्माण सोसायटीत नेले. तेथे एका सदनिकेत नेल्यानंतर मैत्रीणीवर बलात्कार केला. या प्रकाराची वाच्यता केल्यास जीवे ठार मारेन, अशी आरोपीने धमकी दिली होती. त्यामुळे ती आठ दिवस गप्प बसली. नंतर मात्र आरोपीचा त्रास वाढल्याने तिने बुधवारी सायंकाळी सदर पोलीस ठाण्यात बलात्काराची तक्रार नोंदवली. पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला.  

दुसरी घटना मानकापुरातील आहे. ३० वर्षीय प्रियकराने लग्नाचे आमिष दाखवून २०१४ पासून प्रेयसीसोबत अनेकदा शारिरिक संबंध प्रस्थापित केले. आरोपीचे नाव  सचिन गवई  असून तो अहमदाबाद मध्ये राहतो. त्याची बहिण पीडित तरुणी (वय २४) च्या घराजवळ राहते. ते नातेसंबंधातील असल्यामुळे त्यांच्यात ओळखी होती. पहिल्यांदा २०१४ मध्ये एक दिवस बहिणीच्या घरी आल्यानंतर तो तिला घेऊन गोधणीच्या नाल्याजवळ फिरायला गेला. तेथे निर्जन ठिकाणी त्याने तिच्यासोबत शरिरसंबंध प्रस्थापित केले. त्यानंतर कधी, कुठे तर कधी कुठे जाऊन ते शरीरसंबंध प्रस्थापित करू लागले. चिखलदरा येथेही ते पती-पत्नीसारखे फिरायला गेले होते. सदरमधील एका हॉटेलमध्येही त्यांनी श्रिरसंबंध जोडले. अलिकडे मात्र तो तिला टाळू लागला.  

हिच्यासोबत नोंदणी,  दुसरीसोबत सगाई -

युवतीच्या माहितीनुसार, तिने लग्नासाठी दबाव वाढवल्यामुळे मे २०१७ मध्ये त्याने तिला निबंधक कार्यालयात नोंदणी विवाह करायला नेले. तेथे त्याने नोंदणी केली. मात्र, तीन वेळा वेगवेगळी तारिख भेटूनही तो वेगवेगळे कारण सांगून टाळू लागला. दरम्यान त्याने अकोल्यातील एका तरुणीसोबत लग्न जोडून सगाई केल्याचे माहित पडताच तरुणी जाम भडकली. तिने त्याला फोन करून लग्नाबद्दल विचारले. त्याने स्पष्ट नकार दिला. त्यामुळे गुरुवारी ती मानकापूर ठाण्यात पोहचली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला.