शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

सक्रिय रुग्णसंख्येत राज्यात नागपूर दुसऱ्या स्थानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:09 IST

सुमेध वाघमारे नागपूर : नागपूर जिल्ह्यात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या ११ हजारांपुढे गेल्याने धाकधूक वाढली आहे. विशेष म्हणजे, राज्यात ...

सुमेध वाघमारे

नागपूर : नागपूर जिल्ह्यात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या ११ हजारांपुढे गेल्याने धाकधूक वाढली आहे. विशेष म्हणजे, राज्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण असलेल्या पहिल्या १० जिल्ह्यात विदर्भातील चार जिल्हे आहेत. यात नागपूर दुसऱ्या क्रमांकावर आहे. पाचव्या क्रमांकावर अमरावती, सहाव्या क्रमांकावर अकोला तर दहाव्या क्रमांकावर यवतमाळ जिल्हा आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, पहिल्या क्रमांकावर पुणे असून येथे १९,६१५ (२१.११ टक्के) तर , नागपूर जिल्ह्यात ११,४८० (१२.३६ टक्के) अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

कोरोनाची दुसरी लाट म्हणता येत नसली तरी कोविड विषाणूचा प्रादुर्भाव वेगाने वाढत चालला आहे. विदर्भातील चार जिल्ह्यात वाढत्या रुग्णसंख्येने आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने ६ मार्च रोजीच्या रुग्णसंख्येवर आधारित माहिती उपलब्ध केली आहे. त्यानुसार पुणे येथे ११ फेब्रुवारी रोजी ४५८७ तर नागपूर जिल्ह्यात ३४५२ सक्रिय रुग्ण होते २३ दिवसांत या दोन्ही जिल्ह्यात साधारण चारपट वाढ झाली आहे. सक्रिय रुग्णांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर ठाणे जिल्हा असून येथे ११ फेब्रुवारी रोजी ४३१७ तर आता १०,०४४, मुंबई येथे ११ फेब्रुवारी रोजी ४१९७ तर आता ८,९८४, अमरावती येथे ११ फेब्रुवारी रोजी १७०९ तर आता ५,०५७, अकोला येथे ११ फेब्रुवारी रोजी ५०६ तर आता ४,४४८, जळगाव येथे ११ फेब्रुवारी रोजी ५४३ तर आता ४,१६७, औरंगाबाद येथे ११ फेब्रुवारी रोजी ५५३ तर आता ३,७५६, नाशिक येथे ११ फेब्रुवारी रोजी १०६८ तर आता ३,३३२ तर यवतमाळ येथे ११ फेब्रुवारी रोजी ४४७ तर आता १,९०४ कोरोनाचे अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. सक्रिय रुग्णांत वाढ होत असल्याने यातील गंभीर रुग्णही समोर येत आहेत. परिणामी, अतिदक्षता विभागातील खाटा फुल्ल होऊ लागल्य्याने चिंता वाढली आहे.

-विदर्भातील ७ जिल्ह्यात रुग्णवाढीचा दर अधिक

विदर्भातील ७ जिल्ह्यात रुग्णवाढीचा दर अधिक असल्याचे सामोर आले आहे. ६ मार्च रोजीच्या अहवालावरून अकोला जिल्ह्यात हा दर सर्वाधिक , २.११ टक्के होता. वाशिम जिल्ह्यात १.८४ टक्के, अमरावती जिल्ह्यात १.८१ टक्के, वर्धा जिल्ह्यात १.२९ टक्के, यवतमाळ जिल्ह्यात १.०५ टक्के, नागपूर जिल्ह्यात ०.७४ टक्के तर, बुलढाणा जिल्ह्यात ०.७१ टक्के होता.