शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर रेल्वेस्थानक; १२ दिवसात ६,३४९ फुकट्या प्रवाशांना दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 12:01 IST

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने विनातिकीट तसेच सामानाची बुकिंग न करता प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरुद्ध अभियान सुरू केले आहे. अभियानांतर्गत १० ते २२ जुलै दरम्यान २६० रेल्वेगाड्यांची तपासणी करण्यात आली. यात ६३४९ फुकट्या प्रवाशांची धरपकड करण्यात आली.

ठळक मुद्देदपूम रेल्वेची धडक कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने विनातिकीट तसेच सामानाची बुकिंग न करता प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरुद्ध अभियान सुरू केले आहे. अभियानांतर्गत १० ते २२ जुलै दरम्यान २६० रेल्वेगाड्यांची तपासणी करण्यात आली. यात ६३४९ फुकट्या प्रवाशांची धरपकड करण्यात आली.रेल्वे प्रवासात अनेक प्रवासी तिकीट खरेदी न करताच प्रवास करतात. काही प्रवासी जनरल कोचचे तिकीट घेऊन स्लीपर किंवा एसी कोचमध्ये बसतात. तर अनेकजण आपल्या सामानाची बुकिंगच करीत नाहीत. यामुळे रेल्वेच्या महसुलाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. अशा प्रवाशांवर अंकुश लावण्यासाठी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने १० ते २२ जुलैदरम्यान विशेष तिकीट तपासणी अभियान राबविले. विभागीय रेल्वे व्यवस्थापक शोभना बंदोपाध्याय यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक के. व्ही. रमणा यांच्या नेतृत्वात वाणिज्य विभागातील अधिकारी, तिकीट निरीक्षक, वाणिज्य निरीक्षक आणि रेल्वे सुरक्षा दलाचे जवान या कारवाईत सहभागी झाले. अभियानात २६० रेल्वेगाड्यांची तपासणी करण्यात आली. यात फुकट्या ६३४९ प्रवाशांविरुद्ध कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून दंडापोटी १६ लाख ५९ हजार ५२० रुपये दंड वसूल करण्यात आला.कारवाईत विनातिकीट ८३७ प्रवाशांकडून ४ लाख १९ हजार ५५५ रुपये, अनियमित तिकीटधारक २०४१ प्रवाशांकडून ८ लाख ९३ हजार ४५ रुपये आणि सामानाची बुकिंग न करणाºया ३४७१ प्रवाशांकडून ३ लाख ४६ हजार ९२० रुपये दंड वसूल करण्यात आला. प्रवाशांनी दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी योग्य दराचे तिकीट घेऊन प्रवास करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.कचरा पसरविणाऱ्या ९८ जणांना दंडरेल्वेगाडी, रेल्वेस्थानकाच्या परिसरात कचरा पसरविणे गुन्हा आहे. परंतु त्याकडे दुर्लक्ष करून अनेक प्रवासी कचरा पसरवितात. यामुळे रेल्वेगाड्या, रेल्वेस्थानक परिसरात अस्वच्छता निर्माण होते. अभियानात अशा ९८ प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून दंडापोटी ९ हजार ८०० रुपये वसूल करण्यात आले.

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूर