शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर रेल्वे स्थानकात काही काळ घबराट; संघमित्रा एक्स्प्रेसमध्ये बॉम्बचा संशय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 14:40 IST

नागपूर रेल्वेस्थानकावर आलेल्या संघमित्रा एक्स्प्रेसच्या ए १ कोचमध्ये दीर्घकाळ बेवारस असलेल्या बॅगमध्ये बॉम्ब असल्याच्या अफवेने काही काळ घबराट उडाली.

ठळक मुद्देतपासणीनंतर उजेडात आली दारूची तस्करी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर रेल्वेस्थानकावर आलेल्या संघमित्रा एक्स्प्रेसच्या ए १ कोचमध्ये दीर्घकाळ बेवारस असलेल्या बॅगमध्ये बॉम्ब असल्याच्या अफवेने काही काळ घबराट उडाली. नागपूर रेल्वेस्थानकावर गाडी येताच रेल्वे सुरक्षा दलाने हँड मेटल डिटेक्टरच्या साह्याने बॅगची तपासणी केली. बॅगमध्ये स्फोटके नाही तर दारूच्या बाटल्या आढळल्याचे पाहून सर्व प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.रेल्वे प्रशासन व प्रवाशांना श्वास रोखून धरायला लावणारी ही घटना शनिवारी सकाळी ९ च्या सुमारास घली. शनिवारी रेल्वेगाडी क्रमांक १२२९५ बंगळुर-पटना संघमित्रा एक्स्प्रेस नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक १ वर सकाळी ९ वाजता आली. या गाडीच्या ए १ कोचमध्ये बराच वेळपासून एक बॅग बेवारस स्थितीत ठेवलेली होती. त्यामुळे या कोचमधील प्रवाशांमध्ये उलट सुलट चर्चा सुरू झाली. प्लॅटफार्मवर गाडी येताच रेल्वे सुरक्षा दलाचे जवान विकास शर्मा, शाम झाडोकर, विवेक कनोजिया नियमित तपासणी करीत असताना प्रवाशांनी त्यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर आरपीएफ जवानांनी हँड मेटल डिटेक्टरच्या साह्याने बॅगची तपासणी केली असता त्यात बॉम्ब नसल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर बॅगची तपासणी केली असता पाकिटात दारूच्या ३८७० रुपये किमतीच्या ४ बॉटल आढळल्या. बेवारस बॅगमध्ये दारू असल्याचे समजल्यानंतर प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. त्यानंतर संघमित्रा एक्स्प्रेस पुढील प्रवासासाठी रवाना झाली.

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूर