शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर रेल्वेस्थानकावर हवी यंत्रणा : प्रशासनाने तातडीने दखल घेण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 11:24 IST

नागपूर रेल्वे प्रशासनाने अद्यापही पुणे, मुंबईवरून येणाऱ्या रेल्वेगाड्यातील प्रवाशांची तपासणी सुरू केली नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

ठळक मुद्देपुणे, मुंबईवरून येणाऱ्या प्रवाशांची व्हावी तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपराजधानीत कोरोनाचे चार रुग्ण आढळले आहेत. पुणे आणि मुंबईतही कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. परंतु या भयावह स्थितीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने अद्यापही पुणे, मुंबईवरून येणाऱ्या रेल्वेगाड्यातील प्रवाशांची तपासणी सुरू केली नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. रेल्वे प्रशासनाने रेल्वे रुग्णालयात कोरोनाच्या रुग्णांसाठी दोन वॉर्ड तयार केले आहेत. परंतु रेल्वे स्थानकावर रुग्णांची तपासणी करण्याची यंत्रणाच नसल्यामुळे हे वॉर्ड काय कामाचे? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. रेल्वे प्रशासनाने किमान मुंबई आणि पुण्यावरून येणाऱ्या गाड्यातील कोरोनाची लक्षणे वाटत असलेल्या प्रवाशांची तपासणी करण्याची गरज निर्माण झाली आहे.कोरोनाचे बहुतांश रुग्ण असलेल्या पुणे आणि मुंबईवरून नागपुरात रेल्वेगाड्या येत आहेत. यात मुंबई-नागपूर दुरांतो एक्स्प्रेस, मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेस, पुणे-नागपूर एक्स्प्रेस, पुणे-नागपूर गरिबरथ एक्स्प्रेस या नागपुरात समाप्त होणाऱ्या रेल्वेगाड्यांचा समावेश आहे. मुंबई-गोंदिया विदर्भ एक्स्प्रेसमधील बहुतांश प्रवाशीही नागपुरातच उतरतात. त्यामुळे या सर्व गाड्यातील आजारी असलेल्या प्रवाशांची रेल्वे प्रशासनाने तपासणी करण्याची यंत्रणा रेल्वेस्थानकावर उपलब्ध करून देण्याची गरज आहे. परंतु अशी कोणतीच यंत्रणा अद्यापही रेल्वे प्रशासनाने रेल्वेस्थानकावर उपलब्ध करून दिली नाही. यामुळे मुंबई, पुण्यातून नागपुरात येणारे प्रवासी कुठल्याही तपासणीविना थेट रेल्वेस्थानकाच्या बाहेर पडत आहेत. यात एखादा कोरोनाचा संशयित रुग्ण असल्यास हा मोठा धोका होऊ शकतो. त्यामुळे किमान मुंबई, पुण्यावरून येणाºया गाड्यातील प्रवाशांची तपासणी केल्यास संभाव्य धोका टाळता येऊ शकतो. याबाबत रेल्वे प्रशासनाने तातडीने दखल घेण्याची गरज आहे. रेल्वे प्रशासनाने त्वरित रेल्वेस्थानकावर पुणे, मुंबईवरून येणाºया प्रवाशांना तपासण्याची यंत्रणा उपलब्ध करून दिल्यास प्रवासी स्वत:हून डॉक्टरांकडे जाऊन आपली तपासणी करून घेतील. त्यासाठी पूर्वेकडील संत्रा मार्केट भागात आणि पश्चिमेकडील भागात रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची तपासणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे.

केवळ जनजागृती नाही पुरेशीकोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी रेल्वे प्रशासनाने आठ दिवसांपासून रेल्वे प्रवाशांमध्ये जनजागृती करणे सुरू केले आहे. यात स्टीकर, बॅनरच्या माध्यमातून प्रवाशांना सूचना देण्यात येत आहेत. ध्वनिक्षेपकाहूनही प्रवाशांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. परंतु केवळ जनजागृती करून भागणार नसून रेल्वे प्रशासनाने रेल्वेस्थानकावर संबंधित आजाराची लक्षणे वाटत असलेल्या प्रवाशांची तपासणी करण्याची गरज आहे.

मुख्यालयाकडून आदेश आल्यावर करू तपासणीकोरोनाच्या रुग्णांसाठी रेल्वे रुग्णालयात दोन वॉर्ड तयार करण्यात आले आहेत. एखाद्या प्रवाशाने संपर्क साधल्यास त्याची तपासणी करून नमुने खासगी रुग्णालयात पाठविण्यात येतील. परंतु रेल्वे स्थानकावर पुणे-मुंबईकडून येणाºया रेल्वे गाड्यातील प्रवाशांची तपासणी करण्याचे कुठलेही आदेश नाहीत. रेल्वे मुख्यालयाकडून आदेश आल्यानंतर त्यांचीही तपासणी होईल.- एस.जी. राव, सहा. वाणिज्य व्यवस्थापक, मध्य रेल्वे नागपूर विभाग

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूर