शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
2
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
3
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
4
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
5
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
6
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
7
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
8
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
9
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
10
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
11
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
12
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
13
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
14
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
15
Health Tips: शरीरावर असलेले लाल मोस कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
16
Plane Crash: उड्डाणानंतर काही मिनिटांतच विमान कोसळलं; भयानक घटना कॅमेऱ्यात कैद!
17
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
18
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
19
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
20
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका

नागपुरात रेल्वेच्या ६५.६८ लाखांच्या ई तिकिटांचा काळाबाजार उघडकीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 17:20 IST

रेल्वे सुरक्षा दलाने ई तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या आरोपीला अटक करीत ६५.६८ लाखाच्या २८२५ ई तिकिटांचा काळाबाजार उघडकीस आणल्याची माहिती रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योती कुमार सतीजा यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देआरोपीला अटकरेल्वे सुरक्षा दलाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वे सुरक्षा दलाने ई तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या आरोपीला मानेवाडा परिसरातून अटक करीत त्याच्याकडून १.६० लाख रुपये किमतीचे ६५ आरक्षणाचे लाईव्ह तिकिटासह ६५.६८ लाखाच्या २८२५ ई तिकिटांचा काळाबाजार उघडकीस आणल्याची माहिती रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योती कुमार सतीजा यांनी पत्रकार परिषदेत दिली.रेल्वे सुरक्षा दलाने कमांडंट ज्योती कुमार सतीजा यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शिवराम सिंह, विजय पाटील, दीपक वानखेडे, निळकंठ गोरे, किशोर चौधरी, अश्विन पवार, अमित बारापात्रे यांनी अजनी पोलिसांना सोबत घेऊन बालाजीनगर, मानेवाडा रोड येथील आर. पी. टुर्स अँड ट्रॅव्हल्सच्या दुकानात धाड टाकली. तेथे दुकानात मालक शत्रुघ्न सूरज सिंह (३८) रा. बालाजीनगर हा उपस्थित होता. दुकानात १ कॉम्प्युटर, २ लॅपटॉप, राऊटर आढळले. वेगवेगळ््या नावाचे २१२ फेक आयडीवरून रेड मिर्ची, मॅक तात्काल अ‍ॅपद्वारे काढलेली रेल्वे आरक्षणाची ६५ तिकिटे आढळली. त्याची किंमत १ लाख ६० हजार ८७८ रुपये आहे. प्रवाशांकडून प्रति तिकिटावर २०० ते ३०० रुपये अधिक घेऊन ई तिकीट विकत असल्याची माहिती आरोपीने दिली. आरपीएफला संबंधित दलालाने मागील दोन महिन्यात अवैधरीत्या काढलेले ८६० आरक्षणाची तिकिटे किंमत १८ लाख ८६ हजार ९६५ रुपयांची तिकिटे विकल्याची माहिती समजली. दोन महिन्यांपूर्वी यापेक्षा अधिक तिकिटे आरोपीने काढली असावीत असा अंदाज आहे. याशिवाय व्हिवो कंपनीचा मोबाईल किंमत १३ हजार, रोख ९३०० रुपये असा एकूण १.३० लाखाचा मुद्देमाल जप्त केला. आरोपीच्या दुकानात एक रजिस्टर आढळले. त्यात २०१६ ते २०१७ दरम्यान १९०० रेल्वे आरक्षणाची तिकिटे काढल्याची माहिती आढळली. या तिकिटांची किंमत ४३ लाख ८२ हजार ७४६ रुपये आहे. कारवाईत जप्त केलेली आरक्षणाची ६५ तिकिटे, ८६० मागील दोन महिन्यातील तिकिटे आणि १९०० ई तिकिट काढल्याचे रजिस्टर असे एकूण ६५.६९ लाखाच्या २८२५ तिकिटांचा काळाबाजार आरपीएफने उघडकीस आणला आहे. आरपीएफने आरोपीविरुद्ध रेल्वे अ‍ॅक्ट १४३ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूर