शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
7
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
8
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
9
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
10
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
11
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
12
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
13
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
14
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
15
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
16
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
17
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
18
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
19
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
20
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?

नागपूर पोलिसांचा आता कोरोनाशी लढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 20:52 IST

नागरिकांना कोरोनाची लागण होऊ नये म्हणून छातीची ढाल बनून पुढे ठाकलेल्या पोलिसांवरच कोरोनाने आक्रमण केले आहे. १६ अधिकारी आणि कर्मचारी तसेच त्यांच्या कुटुंबीयांसह ४१७ जणांना कोरोणाची लागण झाली आहे. त्यात अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. नीलेश भरणे यांचाही समावेश आहे.

ठळक मुद्दे अतिरिक्त पोलीस आयुक्त नीलेश भरणे यांच्यासह ४१७ जणांना लागण : १६ अधिकारी आणि नातेवाईकांचाही समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागरिकांना कोरोनाची लागण होऊ नये म्हणून छातीची ढाल बनून पुढे ठाकलेल्या पोलिसांवरच कोरोनाने आक्रमण केले आहे. १६ अधिकारी आणि कर्मचारी तसेच त्यांच्या कुटुंबीयांसह ४१७ जणांना कोरोणाची लागण झाली आहे. त्यात अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. नीलेश भरणे यांचाही समावेश आहे. त्यामुळे पोलिसांना आता गुन्हेगारांसोबतच कोरोनाशीही लढा द्यावा लागत आहे.कोरोनाने नागपुरात शिरकाव केल्यापासून संपूर्ण पोलिस यंत्रणा नागरिकांचे कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी पुढे सरसावली. उन्हातान्हात पोलिसांनी रस्त्यावर उभे राहून नागरिकांना कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून काळजी घेतली. मात्र गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने पोलिसांवरच आक्रमण केल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर, शहरात आतापर्यंत अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. भरणे तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक वजीर शेख, संतोष खांडेकर यांच्यासह एकूण ४१७ पोलिस अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या नातेवाईकांना लागण झाली आहे. या सर्वांवर वेगवेगळ्या ठिकाणी उपचार सुरू आहेत. पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव झालेल्या पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी विशेष तपासणी पथक तसेच त्यांच्या घरोघरी जाऊन औषध पुरविणारे पथक निर्माण केले आहेत. पोलीस इस्पितळाचे प्रमुख डॉ. संदीप शिंदे यांच्या नेतृत्वात वैद्यकीय पथक बाधित पोलीस आणि त्यांच्या नातेवाईकांची काळजी घेत आहेत. त्यांना आवश्यक त्या सूचना आणि निर्देश दिले जात आहेत. त्यांच्या प्रकृतीची रोज तपासणी केली जात आहे. कोरोनाबाधित पोलीस अधिकारी कर्मचारी आणि त्यांच्या नातेवाईकांची संख्या तसेच सध्याची स्थिती खालीलप्रमाणे आहे.लागण झालेले पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस कुटुंबीय : ४१७रुग्णालयात भरती असलेले : १९होम आयसोलेटेड : ३२३कोविड सेंटर : १२होम क्वारंटाईन : ६०आतापर्यंत बरे झालेले : ६९मृत : ३कर्तव्यावर हजर झालेले : ९कोरोनासोबत पोलिसांचा लढा सुरू आहे. स्वत:सोबतच नागरिकांचेही कोरोनापासून रक्षण करण्यात आम्ही यश मिळवू, हा विश्वास आहे.डॉ. भूषणकुमार उपाध्याय, पोलीस आयुक्त, नागपूर. 

टॅग्स :Nagpur Policeनागपूर पोलीसcorona virusकोरोना वायरस बातम्या