शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सवासाठी नागपूर पोलीस तत्पर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 01:53 IST

आगामी गणेशोत्सवाच्या निमित्ताने नागपूर पोलिसांनी ‘नीरी’च्या (नॅशनल एन्व्हायर्नमेन्टल इंजिनिअरींग रिसर्च इन्स्टिट्यूट) वैज्ञानिकांसमवेत पूर्वतयारी सभेचे आयोजन केले होते.

‘नीरी’त पूर्वतयारी सभा : वैज्ञानिकांकडून पर्यावरणावरील परिणामांची जाणून घेतली माहितीलोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : आगामी गणेशोत्सवाच्या निमित्ताने नागपूर पोलिसांनी ‘नीरी’च्या (नॅशनल एन्व्हायर्नमेन्टल इंजिनिअरींग रिसर्च इन्स्टिट्यूट) वैज्ञानिकांसमवेत पूर्वतयारी सभेचे आयोजन केले होते. गणेशोत्सवादरम्यान विविध प्रकारच्या प्रदूषणांमध्ये वाढ होते. नागरिकांच्या पुढाकारातून यात घट होऊ शकते. याबाबत संयुक्त विद्यमाने जागृतीदेखील करण्यात आली. तसेच वैज्ञानिकांकडूनदेखील याबाबत सविस्तरपणे जाणून घेण्यात आले.‘नीरी’च्या सभागृहात आयोजित बैठकीला पोलीस आयुक्त डॉ.के.वेंकटेशम् प्रामुख्याने उपस्थित होते. गणेशोत्सवादरम्यान ध्वनिप्रदूषण, वायूप्रदूषण यांच्यात वाढ होते. तसेच घनकचरा व्यवस्थापनाची समस्यादेखील समोर येते याकडे त्यांनी लक्ष वेधले. सोबतच गणेशमूर्तींच्या विसर्जनामुळे पर्यावरणाला बसणारा फटका यावरदेखील त्यांनी भाष्य केले. पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांनी यावेळी गणेशोत्सवासाठी नागपूर पोलीस कशा पद्धतीने तयार आहे, याबाबत सादरीकरण केले. यावेळी ‘नीरी’चे मुख्य वैज्ञानिक डॉ.जे.एस.पांडे हेदेखील उपस्थित होते. वरिष्ठ वैज्ञानिक डॉ.कृष्णा खैरनार हे कार्यक्रमाचे समन्वयक होते.महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची भेटदरम्यान, जी.एच.रायसोनी लॉ स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ‘नीरी’ला भेट दिली. ‘नीरी’ची नेमकी कार्यप्रणाली कशी आहे तसेच येथे कुठल्या प्रकारचे संशोधन होते, हे त्यांनी जाणून घेतले. यावेळी विविध प्रयोगशाळा विद्यार्थ्यांना दाखविण्यात आल्या. ‘नीरी’चे प्रधान वैज्ञानिक प्रकाश कुंभारे यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण विज्ञान व पर्यावरणासंबंधीच्या विविध धोरणांची माहिती दिली. डॉ.सोना कुमार या समन्वयक होत्या.