शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

प्लास्टिकमुक्तीसाठी नागपूर प्लॉगर्सचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 12:35 IST

Nagpur News फिटनेसकरिता धावताना वा चालताना प्लास्टिक कचरा उचलून परिसर स्वच्छ करणे हा उपक्रम विविध देशांमध्ये सुरू आहे. या उपक्रमाला 'प्लॉगिंग'  संबोधले जाते.

ठळक मुद्देपहिल्या मोहिमेत २० किलो प्लास्टिक गोळा

अंकिता देशकर

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : फिटनेसकरिता धावताना वा चालताना प्लास्टिक कचरा उचलून परिसर स्वच्छ करणे हा उपक्रम विविध देशांमध्ये सुरू आहे. या उपक्रमाला 'प्लॉगिंग'  संबोधले जाते. काही तरुणांनी 'नागपूर प्लॉगर्स' नावाचा समूह स्थापन करून या उपक्रमाला नागपुरात सुरुवात केली आहे.

अमल सुतोणे व कौस्तुभ फरफड हे अभियांत्रिकीचे विद्यार्थी या उपक्रमाचे नेतृत्व करीत आहेत. ते पुणे येथील प्लॉगिंग समूहाचे सदस्य आहेत. कोरोना संक्रमणामुळे नागपुरात परत आल्यानंतर त्यांना हा उपक्रम येथे सुरू करण्याची प्रेरणा मिळाली. नागपूर प्लॉगर्स प्लास्टिक पिशव्या, बॉटल्स, ग्लास व अन्य सहज उचलता येणारा कचरा गोळा करून तो महानगरपालिकेला हस्तांतरित करतात. आठवड्यापूर्वी सुरू झालेला हा उपक्रम लोकप्रिय झाला असून अनेकजन स्वत:हून उपक्रमात सहभागी होत आहेत. स्वच्छतेसह पर्यावरण संवर्धनासाठी जनजागृती करणे हादेखील उपक्रमाचा उद्देश आहे. नरेंद्रनगर उड्डाण पूल व सोनेगाव तलाव परिसरात राबविण्यात आलेल्या पहिल्या मोहिमेत २० किलो प्लास्टिक कचरा गोळा करण्यात आला.

स्वीडनमध्ये सुरुवात

एरिक अहलस्ट्रॉम यांनी २०१६ मध्ये स्वीडन येथे या उपक्रमाची सुरुवात केली. 'प्लॉगिंग'' हा 'जॉगिंग' व 'प्लॉका अप' (पिक अप) या शब्दांचा संयुक्त शब्द आहे. हा उपक्रम जगामध्ये वेगात वाढत आहे.

विवेक गौरव यांचे मार्गदर्शन

नागपूर प्लॉगर्सची स्थापना करताना पुणे प्लॉगर्सचे संस्थापक विवेक गौरव यांचे मार्गदर्शन घेण्यात आले. त्यांनी लोकमतशी बोलताना हे स्वच्छ भारत मिशनचे दुसरे रुप असल्याचे सांगितले. या उपक्रमांतर्गत स्वत:ची फिटनेस जपण्यासह परिसर स्वच्छ ठेवण्याचे कार्य केले जाते.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदी