शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात पेट्रोल @ 83

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 10:12 IST

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत झालेल्या इंधन दरवाढीमुळे देशातील पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. यामुळे नागपुरात पेट्रोल व डिझेलच्या दराने नवा उच्चांक गाठत पेट्रोलने ८३ रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.

ठळक मुद्दे२५ दिवसांत ९१ पैशांची वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत झालेल्या इंधन दरवाढीमुळे देशातील पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. यामुळे नागपुरात पेट्रोल व डिझेलच्या दराने नवा उच्चांक गाठत पेट्रोलने ८३ रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. २५ दिवसांत पेट्रोल प्रति लिटर तब्बल ९१ पैशांनी वधारले आहे. सरकारने पेट्रोलचे दर थेट १०० रुपयांवर न्यावेत, अशी उपरोधिक टीका ग्राहकांनी लोकमतशी बोलताना केली.जीएसटीच्या २८ टक्के करटप्प्यात पेट्रोल आणि डिझेलचा समावेश केल्यास नागरिकांना पेट्रोल ५० रुपयांत मिळेल. पण केंद्र सरकारने वित्तीय तूट भरून काढण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी करण्यास आणि जीएसटीमध्ये समावेश करण्यास नकार दिला आहे. पेट्रोलची मूळ किंमत ३२ रुपये असतानाही ग्राहकांना ८३ रुपयांत खरेदी करावे लागत आहे. एप्रिल महिन्यातील पेट्रोलच्या दरवाढीचा तक्ता पाहिल्यास १ एप्रिलला पेट्रोलचे दर ८२.०९ रुपये होते. त्यात तब्बल आठ दिवस दरवाढ होऊन ८ एप्रिलला ८२.४० रुपयांवर पोहोचले. त्यानंर ९ ते १३ एप्रिलदरम्यान १२ पैशांची कपात होऊन भाव ८२.२८ रुपयांवर गेले. त्यानंतर भावात निरंतर वाढ होत आहे. १३ एप्रिल ते २५ एप्रिलदरम्यान ८१ पैशांची वाढ झाली. २० एप्रिलला पेट्रोल ८२.४५ रुपये, २१ रोजी ८२.५८ रुपये, २२ रोजी ८२.७६ रुपये, २३ रोजी ८२.८६ रुपये आणि २४ एप्रिलला पेट्रालचे दर ८२.९९ रुपयांवर पोहोचले होते. तीन वर्षांपूर्वी दुष्काळ आणि गेल्यावर्षी मद्याची दुकाने बंद झाल्यानंतर राज्य सरकारने आकारलेला अधिभार कमी केल्यास राज्यात पेट्रोलमध्ये ४ ते ५ रुपयांची कपात होईल, असे ग्राहक संघटनांनी सांगितले.आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव प्रति बॅरल ८० डॉलरपर्यंत पोहोचले आहे. हे भाव १०० डॉलरवर जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर होणाऱ्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांना इंधनासाठी खिसा रिकामा करावा लागणार आहे.

टॅग्स :Petrolपेट्रोल