शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर ‘वन डे’ला जीएसटीचा ताप!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 01:28 IST

भारत विरुद्ध आॅस्ट्रेलिया दरम्यान १ आॅक्टोबरला होणाºया एकदिवसीय क्रिकेट सामन्यावर जीएसटीमुळे कायद्याचे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देभारत-आॅस्ट्रेलिया सामना १ आॅक्टोबरला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारत विरुद्ध आॅस्ट्रेलिया दरम्यान १ आॅक्टोबरला होणाºया एकदिवसीय क्रिकेट सामन्यावर जीएसटीमुळे कायद्याचे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. जीएसटी कायद्यात मनोरंजनाच्या मंजुरीचे अधिकार संबंधित प्राधिकरणाला देण्यात आले आहे. जामठा हे मैदान जि.प.च्या अंतर्गत येत असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मनोरंजनाच्या मंजुरीची फाईल जि.प.कडे पाठविण्यात आली. परंतु शासनाने मनोरंजनाच्या मंजुरीचे अधिकार जि.प.ला दिलेच नसल्याने, मनोरंजनाच्या मंजुरीविना ही फाईल जिल्हाधिकाºयांकडे पाठविण्यात आली. त्यामुळे १ आॅक्टोबरला होणारा सामना मनोरंजनाच्या परवानगीविना होणार आहे.१ आॅक्टोबरला होणाºया सामन्यासाठी व्हीसीएकडून आॅनलाईन तिकीट विक्रीही सुरू झाली आहे. यासाठी शुल्काची आकारणी होत असल्याने यास मनोरंजन विभागाची परवानगी आवश्यक असल्याचे सांगण्यात येते. जीएसटीपूर्वी मनोरंजनाची परवानगी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात येत होती. मात्र जीएसटी कायद्यात मंजुरीचे अधिकारी संबंधित प्राधिकरणास देण्यात आले आहे.जामठा व्हीसीए मैदान जिल्हा परिषदच्या हद्दीत येत असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मंजुरीची फाईल जिल्हा परिषदच्या पंचायत विभागाकडे पाठविली. पंचायत विभागाकडून यावर वित्त विभागाकडे मत मागविले. वित्त विभागाने जीएसटी विभागाकडून मत घेतले. मात्र जीएसटी विभागाकडून मंजुरीबाबतचा स्पष्ट अभिप्राय देण्यात आला नाही. त्यामुळे ही फाईल पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे परत पाठविली. आता त्यावर जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात, हे बघायचे आहे.यासंदर्भात पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण निंबाळकर यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की मनोरंजनाच्या मंजुरीबाबत शासनाकडून मत मागविण्यात आले. शासनाने मनोरंजनाच्या मंजुरीबाबत जिल्हा परिषदेला कुठलेही अधिकार दिले नाही. जि.प.ला मंजुरीचे अधिकार नसल्याने ही फाईल पुन्हा जिल्हाधिकाºयांकडे पाठविण्यात आली आहे.