शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर मनपातील शिक्षकांना अतिरिक्त ठरवून वाढविले टेन्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 12:41 IST

नागपूर महापालिका शाळांतील शालार्थ प्रणालीत कार्यरत असलेल्या शिक्षकांपैकी १९ शिक्षकांना अतिरिक्त ठरविण्यात आले आहे.

ठळक मुद्देशिक्षणाधिकाऱ्यांनी काढले परिपत्रक १९ शिक्षकांचा समावेश, आक्षेपासाठी एक दिवस अन् सुनावणीही नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिका शाळांतील शालार्थ प्रणालीत कार्यरत असलेल्या शिक्षकांपैकी १९ शिक्षकांना अतिरिक्त ठरविण्यात आले आहे. महापालिकेच्या संकेतस्थळावर ही यादी उपलब्ध करण्यात आली आहे. शिक्षण विभागातही ही यादी लावण्यात आली आहे. सोमवारी शिक्षणाधिकारी प्रीती मिश्रीकोटकर यांनी याबाबतचे परिपत्रक काढले आहे. यावर बुधवार १२ फेब्रुवारीपर्यंत शिक्षण विभागाकडे आक्षेप नोंदविता येईल. परंतु त्यावर कोणत्याही प्रकारची सुनावणी होणार नाही, असे यात नमूद केल्याने शिक्षकात प्रचंड खळबळ उडाली आहे.महापालिकेच्या २९ माध्यमिक शाळा आहेत. यातील १७ अनुदानित तर ११ शाळा विनाअनुदानित आहेत. शिक्षकांच्या नियुक्त्या करताना आस्थापनेचा घोळ व चुका केल्या. त्यामुळे शिक्षकांची सेवाज्येष्ठता यादी अद्याप तयार करण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे अतिरिक्त ठरविण्यात आलेल्या शिक्षकात शालार्थ प्रणातील कार्यरत असलेल्या फक्त चार शिक्षकांचा समावेश असल्याची माहिती आहे. शिक्षकांना अतिरिक्त ठरविताना काही निक ष ठरलेले आहेत. अशा निकषांचे पालन न करताच शिक्षकांना तडकाफडकी अतिरिक्त ठरविण्यात आल्याचा आक्षेप शिक्षक संघाने नोंदविला आहे.अतिरिक्त ठरविण्यात आलेल्या शिक्षकात निर्मला कॅजमीर, संजय पंडित, निलोफर परवीन मो. अर्शद, मानसी मुखर्जी, कमलाकर मानमोडे, रेजिना ए. नबीबेन, हिना चौधरी, वनिता काळे, पूजा भोयर, सुनील सरोदे, ज्योती नाईक, काजी नरुल लतीफ, सहीना शेख आरीफ अहमद, योगिता भूषणवार, उमा देशमुख, काजी महफूज अहमद, शाहीन रियाज शेख, नूरजहां जावेद जाफर, शमप्ता परवीन मन्सुरी, कमलेश बावणे व नाहीद जाफर आदींचा समावेश आहे.शिक्षक ांची सेवाज्येष्ठता यादी जाहीर करण्याची शिक्षक संघटनेतर्फे वेळोवेळी मागणी करण्यात आली. परंतु आस्थापनेत चुका व घोळ निर्माण केला असल्याने आजवर ही यादी जाहीर करण्यात आलेली नाही. सेवाज्येष्ठता यादीच जाहीर केलेली नाही. तसेच परिपत्रकात शालार्थ प्रणालीत कार्यरत शिक्षकांचा अतिरिक्त शिक्षकात समावेश असल्याचे शिक्षणाधिकाऱ्यांनी परिपत्रकात नमूद केले आहे. परंतु अतिरिक्त ठरविण्यात आलेल्यांपैकी फक्त चारच शिक्षक शालार्थ प्रणालीत कार्यरत आहेत. त्यामुळे गोंधळ निर्माण झाला आहे. नागपूर महानगरपालिका शिक्षक संघाने या निर्णयावर आक्षेप घेतला आहे. काढण्यात आलेले परिपित्रक चुक ीचे व नियमबाह्य असल्याचे म्हटले आहे.परिपत्रक नियमबाह्य व चुकीचेमाध्यमिक शिक्षकांची सेवाज्येष्ठता व आस्थापना यात शिक्षण विभागाने घोळ घातला आहे. शालार्थ प्रणातील कार्यरत शिक्षकांना अतिरिक्त ठरविल्याचे परिपत्रकात नमूद केले आहे. परंतु यातील चारच शिक्षक या प्रणातील कार्यरत आहेत. सोमवारी १० फेब्रुवारीला यादी जाहीर केली व बुधवारपर्यंत आक्षेपाला नोंदविता येतील, पण यावर सुनावणी नाही. कोणत्याही प्रक रणात संबंधितांना सुनावणीची संधी दिली जाते. परंतु येथे संधी नाकारली आहे. हा निर्णय चुक ीचा असल्याने तो शिक्षणाधिकाºयांनी मागे घ्यावा. शिक्षकांचे समायोजन करावे.राजेश गवरे, अध्यक्ष,ना.म.न.पा. शिक्षक संघ

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र