शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर मनपाने बेरोजगार युवकांना डावलून दिली सेवानिवृत्तांना संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 23:47 IST

बेरोजगारी ही भीषण समस्या आहे. युवकांना रोजगार मिळावा, यासाठी शासनाच्या विविध विभागाच्या योजना आहेत. परंतु नागपूर महापालिकेला बेरोजगार युवकांच्या तुलनेत ज्येष्ठांवर अधिक विश्वास आहे. म्हणूनच सेवानिवृत्त झालेल्या ४३ अधिकारी व कर्मचाऱ्यांची महापालिकेच्या विविध विभागात मानधन तत्त्वावर नियुक्ती केली आहे. महापालिकेच्या या धोरणावर टीका होत आहे.

ठळक मुद्देज्येष्ठांवर विश्वास; युवक दुर्लक्षितयुवकांना संधी देण्याची नगरसेवकांची मागणी

आॅनलाईन लोकमतनागपूर : बेरोजगारी ही भीषण समस्या आहे. युवकांना रोजगार मिळावा, यासाठी शासनाच्या विविध विभागाच्या योजना आहेत. परंतु नागपूर महापालिकेला बेरोजगार युवकांच्या तुलनेत ज्येष्ठांवर अधिक विश्वास आहे. म्हणूनच सेवानिवृत्त झालेल्या ४३ अधिकारी व कर्मचाऱ्यांची महापालिकेच्या विविध विभागात मानधन तत्त्वावर नियुक्ती केली आहे. महापालिकेच्या या धोरणावर टीका होत आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी यावर आक्षेप घेतला. सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या सदस्यांनी बेरोजगार युवकांना कंत्राटपद्धतीवर काम देण्याची मागणी केली.महापालिकेत ५४ अधिकारी व कर्मचाऱ्यांना कंत्राटपद्धतीने नियुक्त करण्यात आले होते. यातील सात जणांना कमी केले. महापालिकेतून निवृत्त होणारे कर्मचारी व अधिकारी नियुक्त करता यावे, यासाठी सात जणांना कमी करण्यात आल्याची चर्चा आहे. स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाल्या बोरकर यांनी यावर आक्षेप घेतला. सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना पेन्शन म्हणून मोठी रक्कम मिळते. त्यानंतरही त्यांना कामावर ठेवले जाते. त्याऐवजी शिक्षित बेरोजगार युवकांना संधी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. सेवानिवृत्त झालेल्यांना पेन्शनमुळे उदरनिर्वाहाची चिंता नाही. कामाची गरज असलेल्या युवकांना संधी द्यावी, अशी भूमिका त्यांनी मांडली.काँग्रेसचे मनोज सांगोळे यांनीही यावर आक्षेप घेतला. पेन्शन मिळत असल्याने सेवानिवृत्तांना काम करायचेच असेल तर त्यांनी याचा मोबदला घेऊ नये. बेरोजगार युवकांना नोकरीची संधी द्यावी. महापालिकेतील रिक्त पदावर त्यांची नियुक्ती करावी अशी सूचना सांगोळे यांनी केली.कंत्राटपद्धतीवर ५४ जणांची नियुक्तीगेल्या काही वर्षात महापालिकेतील अधिकारी व कर्मचारी मोठ्याप्रमाणात सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे अन्य कर्मचारी व अधिकाऱ्यांवर कामाचा भार वाढल्याने सेवा कंत्राट पद्धतीवर ५४ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. सार्वजनिक बांधकाम विभागात सर्वाधिक ५१ कर्मचारी व अधिकारी भरती करण्यात आले. यात ११ अभियंता, २६ पदवीधर, सुपरवायजर व १४ आयटीआय पात्रताधारक सुपरवाजयरचा समावेश आहे. संबंधितांवर सिमेंट काँक्रिट रोडच्या टप्पा -२ ची देखरेख करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तसेच पेंच प्रकल्पात सार्वजनिक आरोग्य अभियंता, पर्यावरण अधिकारी व परिवहन विभागात सहायक लेखापाल आदींची कंत्राटपद्धतीवर नियुक्ती करण्यात आली आहे.

 

टॅग्स :civic issueनागरी समस्या