शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर महापालिका अधिकाऱ्यांवर राहणार ‘स्मार्ट वॉच’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 10:05 IST

मनपात नव्याने आलेले आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी आधुनिक यंत्रणेचा आधार घेत चांगलाच अंकुश कसला आहे. जीपीएस यंत्रणेद्वारे अधिकारी व कर्मचाऱ्यांना ट्रॅक करण्यासाठी स्मार्ट वॉच तयार करण्यात आली आहे.

ठळक मुद्देजीपीएस यंत्रणेद्वारे ट्रॅक होतील अधिकारी व कर्मचारी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मनपाचे अधिकारी व कर्मचारी कार्यस्थळावरून गायब राहत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या. मनपात नव्याने आलेले आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी आधुनिक यंत्रणेचा आधार घेत चांगलाच अंकुश कसला आहे. जीपीएस यंत्रणेद्वारे अधिकारी व कर्मचाऱ्यांना ट्रॅक करण्यासाठी स्मार्ट वॉच तयार करण्यात आली आहे.विशेष म्हणजे ही स्मार्ट वॉच केवळ सफाई कर्मचाऱ्यांनाच देण्यात येणार होती; नंतर मात्र मनपाच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनासुद्धा देण्याचा निर्णय घेण्यात आला. स्वत: मनपा आयुक्त वीरेंद्र सिंह यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हातालासुद्धा स्मार्ट वॉच राहणार आहे. मनपात कार्यालयीन वेळेत अधिकारी व कर्मचारी आपल्या टेबलवर उपस्थित नसतात, अशा तक्रारी वाढल्या होत्या.सिंह यांनी आपला पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी कार्यालयाचे निरीक्षण केले. यात अनेक कर्मचारी आपल्या कार्यस्थळी आढळून आले नाही. त्यावर उपाय म्हणून सर्वांना स्मार्ट वॉच देण्याचा निर्णय घेण्यात आला. काही दिवसांपूर्वी मनपा आयुक्तांसह ३२ अधिकाऱ्यांना स्मार्ट वॉच देण्यात आली. त्यांची मशीनमध्ये नोंदणी करण्यास सांगण्यात आले. मनपा आयुक्त सिंह यांनी सांगितले की, स्मार्ट वॉचचा वापर म्हणजे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर परिणाम होणार नाही. केवळ कार्यालयीन वेळेत सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत ट्रॅकिंग करण्यात येईल. कार्यालयीन वेळ संपल्यानंतर ट्रॅकिंग बंद करण्यात येईल. सर्व सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नियमांमध्ये राहून आपली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडावी, हीच अपेक्षा आहे. यावेळी अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, नवनियुक्त उपायुक्त नितीन कापडनीस, अतिरिक्त उपायुक्त राजेश मोहिते, आयटीआय लि. चे अभय खरे यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.

कामाच्या वेळेची माहिती मिळेलअतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर यांनी सांगितले की, कर्मचाऱ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात काम करणे अपेक्षित आहे. त्यांच्या क्षेत्राचे जियो फेंसिंग करण्यात येईल. जेव्हा कर्मचारी स्मार्ट वॉच लावून आपल्या क्षेत्रात प्रवेश करेल, तेव्हा त्यांची रिअल टायमिंग दाखल होईल. यावरून हे लक्षात येईल, की कर्मचारी किती वेळ आपल्या कामावर उपस्थित होता. ही सर्व माहिती मनपा आयुक्तांना त्यांच्या डॅशबोर्डावर दिसेल.

वाहनांवरही जीपीएस सिस्टीममनपा आयुक्त सिंह यांनी सांगितले की, अधिकाऱ्यांच्या वाहनांचा सरकारी कामासाठी वापर करण्यात येतो की नाही यावर सुद्धा नजर ठेवण्यासाठी जीपीएस ट्रॅकिंग सिस्टीम लवकरच लावण्यात येईल.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका