शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर मनपाच्या १५० शाळा होणार डिजिटल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 13:24 IST

नागपूर महापालिकेच्या शाळा डिजिटल करण्यासाठी शासनाकडून सहा कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. यातून १५० शाळांचे वर्ग आता डिजिटल पद्धतीने सुरू करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देशासनाकडून सहा कोटींचा निधी शिक्षण समितीच्या प्रस्तावाला मंजुरी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर महापालिकेच्या शाळा डिजिटल करण्यासाठी शासनाकडून सहा कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. यातून १५० शाळांचे वर्ग आता डिजिटल पद्धतीने सुरू करण्यात येणार आहे. यामुळे महापालिकेच्या शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्याला मदत होणार आहे.मनपाच्या शिक्षण समितीतर्फेशाळा डिजिटल करण्याबाबत पालकमंत्र्यांकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्याला मंजुरी दिली आहे, अशी माहिती शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे यांनी शिक्षण समितीच्या बैठकीत दिली. उपसभापती भारती बुंदे, सदस्य रिता मुळे, राजेंद्र सोनकुसरे, प्रमिला मंथरानी, मनोज गावंडे, मो .इब्राहिम तौफिक अहमद, उपायुक्त राजेश मोहिते, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार आदी े उपस्थित होते.महापालिके च्या शाळांतील सर्व विद्यार्थ्यांना बूट व मोजे देण्याचा प्रस्ताव बैठकीत पारित करण्यात आला. बनातवाला शाळेसाठी मनपाने चार कोटी रुपये खर्च करून तयार केलेल्या इमारतीचे लोकार्पण पालकमंत्री यांच्या हस्ते लवकरच करण्यात येणार आहे. यावर्षी विद्यार्र्थ्यांना गणवेशासह स्वेटर पुस्तकांचे वाटप करण्यात येणार आहे. शाळेतील विद्यार्थ्यांच्या पटसंख्येत वाढ होण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. तसेच सायकल बँक योजनेंतर्गत दुरून येणाऱ्या विद्यार्थ्यांनाना सायकलचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती दिलीप दिवे यांनी दिली.प्रारंभी सभापतींनी शाळा निरीक्षकाकडून स्वेटर वाटप केल्याबाबत शाळानिहाय आढावा घेतला. महापालिकेच्या शाळांमध्ये इयत्ता ५ ते १० वर्गात सेमी इंग्रजी माध्यम सुरू करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. शासनाच्या निर्णयानुसार नागरी भागातील शाळांमध्ये शालेय पोषण आहार देण्याबाबत विचार करण्यात यावा, त्याचप्रमाणे शासनाच्या निर्देंशानुसार व अध्यादेशानुसार त्याची अंमलबजावणी व्हावी, असे निर्देश दिवे यांनी दिले. पुढील शैक्षणिक वर्षात घड्याळी तासिका शिक्षक नियुक्त करण्याबाबत शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार यांनी प्रस्ताव समितीपुढे सादर केला. यावर लवकरच निर्णय घेतला जाणार आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका