शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर मनपाकडून ‘श्वानदंश’ आकडेवारीचा ‘झोलझाल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2022 07:15 IST

Nagpur News नागपूर शहरात श्वानदंशाची नेमकी आकडेवारी किती असा प्रश्न उपस्थित झाला आहे. २०२० व २०२२ मध्ये प्राप्त झालेल्या माहितीच्या अधिकाराच्या आकडेवारीतून मनपाची ही ‘पोलखोल’ झाली आहे.

ठळक मुद्देएकाच कालावधीतील दंशांच्या आकड्यात ६७ टक्क्यांचा फरकदोन माहिती अधिकारांतील आकड्यांमध्ये तफावत

योगेश पांडे

नागपूर : उपराजधानीत भटक्या श्वानांची प्रचंड दहशत वाढली असून, शहराच्या अनेक भागात तर रात्रीच्या वेळी जाणे फारच कठीण झाले आहे. एकीकडे श्वानांमुळे नागरिक त्रस्त झाले असताना मनपाने मात्र भटक्या श्वानांच्या दंशाच्या आकडेवारीचाच खेळ सुरूच ठेवला आहे. मनपानेच अवघ्या सव्वा वर्षात २०१९-२० सालच्या स्वत:च्याच आकडेवारीत हेराफेरी केली असून, श्वानदंशांची संख्याच कमी दाखविण्याचा प्रताप केला आहे. त्यामुळे शहरात श्वानदंशाची नेमकी आकडेवारी किती असा प्रश्न उपस्थित झाला आहे. २०२० व २०२२ मध्ये प्राप्त झालेल्या माहितीच्या अधिकाराच्या आकडेवारीतून मनपाची ही ‘पोलखोल’ झाली आहे.

उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी काही दिवसांअगोदर माहिती अधिकाराअंतर्गत मनपाकडे विचारणा केली होती. २०१९-२० सालापासून किती नागरिकांना भटक्या श्वानांचा दंश झाला हे त्यांनी विचारले होते. याअगोदर याचसंदर्भात २०२० मध्येदेखील मनपाने माहितीच्या अधिकारात माहिती दिली होती. दोन्ही माहिती अधिकारांत मनपाच्या आरोग्य विभागाने श्वानदंश झालेल्या नागरिकांची आकडेवारी दिली आहे. मनपाने यंदा दिलेली आकडेवारी ही २०२०च्या आकडेवारीपासून पूर्णत: वेगळी आहे. दोन्ही आकड्यांत तब्बल ११ हजार ५५० इतक्या दंशांची तफावत आहे. विशेष म्हणजे श्वानदंशांच्या आकड्यात वाढ झाली नसून घट झाली आहे. मनपाने नेमके आकडेवारीतील गणित का बिघडविले व श्वानदंश झालेल्या नागरिकांची नेमकी संख्या किती, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

मनपाचे अंकगणित की दिशाभूल?

जुन्या आकडेवारीनुसार एप्रिल २०१९ ते मार्च २०२० या कालावधीत नागपुरातील १७ हजार २५१ नागरिकांना भटक्या श्वानांनी दंश केला होता. मात्र माहिती अधिकारातील नवीन आकडेवारीनुसार याच कालावधीत श्वानदंश झालेल्या नागरिकांची आकडेवारी ही अवघी पाच हजार ७०१ इतकी दाखविण्यात आली आहे. श्वानदंशाच्या रुग्णांची आकडेवारी वाढू शकते. मात्र ही संख्या कमी करण्याचे ‘मॅजिक’ मनपाने केले आहे. यामागे मनपाचे अंकगणित आहे, की दिशाभूल असा प्रश्न उपस्थित होत आहे.

नेमकी खरी माहिती कोणती?

माहितीच्या अधिकारांतर्गत नेमकी व अचूक माहिती असणे अपेक्षित असते. मनपाच्या आरोग्य विभागाकडून एकाच कालावधीत झालेल्या संपूर्ण शहरात भटक्या श्वानांच्या दहशतीबाबत वेगवेगळी माहिती देण्यात येत असेल तर हा संभ्रम निर्माण करणारा प्रकार आहे.

टॅग्स :dogकुत्रा