शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2024 06:15 IST

शहर बससेवेचे कंत्राट देण्यासाठी नियम धाब्यावर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राजकीय पक्षांना एक हजार कोटी रुपयांचे निवडणूक रोखे देणाऱ्या मेघा इंजिनिअरिंग कंपनीची सहकारी कंपनी असलेल्या एन्वी ट्रान्स प्रा. लि. कंपनीवर नागपूर महापालिका मेहेरबान झाली आहे. या कंपनीला शहर बससेवेसाठी तब्बल १३०० कोटींचे कंत्राट देण्याची प्रक्रिया राबविली जात आहे. 

विशेष म्हणजे कंत्राट प्रक्रियेत ही एकमेव कंपनी सहभागी आहे. ऐन निवडणुकीच्या आचारसंहितेत राबविण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेत महापालिकेकडून नियम धाब्यावर बसविल्याचा आरोप नागपूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांनी केला. ही निविदा प्रक्रिया रद्द करून ती नियमांनुसार पुन्हा राबविण्याची मागणी त्यांनी केली.

दरवर्षी दरवाढ देण्याचा कट निविदा नियमांनुसार कंत्राटदाराला देण्यात येणारी दरवाढ ही बंधनकारक नसते, तरी या निविदाप्रक्रियेत कंत्राटदार कंपनीला दरवर्षी दरवाढ देण्याचा कट रचला गेला आहे. या माध्यमातून महापालिकेला दरवर्षी कोट्यवधींचा अतिरिक्त भुर्दंड बसेल आणि कंत्राटदार कंपनीला कोट्यवधी रुपयांचा लाभ पोहोचणार, अशी व्यवस्था करण्यात आली.लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता १६ मार्चपासून लागू झाली आहे, तरी महापालिकेने मतदानाच्या काही दिवसांपूर्वी या निविदा प्रक्रियेला मुदतवाढ दिली, हीच कृती संशयास्पद आहे. सर्व नियमांचे उल्लंघन करून सुरू असलेली निविदा प्रक्रिया रद्द करावी, असे ठाकरे यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका