शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

नागपूर पावसाळी अधिवेशन; सरकारला घेरण्याची विरोधकांची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 11:52 IST

बुधवारपासून सुरू होत असलेल्या पावसाळी अधिवेशनात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसनेराज्य सरकारला घेरण्याचा निर्धार केला आहे.

ठळक मुद्देशेतकरी प्रश्नांवरून विरोधक करणार ‘हल्लाबोल’घोटाळे, कायदा-सुव्यवस्थेवर सरकारला घेरणार

योगेश पांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बुधवारपासून सुरू होत असलेल्या पावसाळी अधिवेशनात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसनेराज्य सरकारला घेरण्याचा निर्धार केला आहे. नवी मुंबई येथील सिडको जमिनीच्या व्यवहारावरून कॉंग्रेस व सत्ताधारी यांच्यात होत असलेल्या आरोप-प्रत्यारोपांची सावली या अधिवेशनावर राहणार आहे. या मुद्यावरून विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेण्याचे ठरविले आहे. सोबतच कर्जमाफी झाल्यानंतर दीड लाखांवरील कर्जाच्या वसुलीसाठी ऐन खरीपाच्या हंगामात शेतकऱ्यांमागे बँकांचा तगादा, पीक विमा, शेतकरी आत्महत्या, कायदा व सुव्यवस्था स्थिती इद्यादी मुद्यांवरून सरकारची कोंडी करण्याचा पवित्रा विरोधकांनी घेतला आहे.४ जुलैपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळ अधिवेशनाची नेमकी रणनीती ठरविण्यासाठी विरोधी पक्षांची बैठक मंगळवारी सकाळी नागपुरात होणार आहे. नागपुरात झालेले हिवाळी अधिवेशन कर्जमाफीच्या मुद्यावरूनच गाजले होते. यंदा पावसाळी अधिवेशन विदर्भातच होत असल्यामुळे विरोधकांची भूमिका शेतकरीकेंद्रित राहण्याची शक्यता राहणार असून कर्जमाफीतील गोंधळ, बोंडअळी नुकसानभरपाई, प्लॅस्टिकबंदी, ‘डिजिटल महाराष्ट्र’मधील त्रुटी, मंत्र्यांवर लागलेले घोटाळ्यांचे आरोप, इत्यादी मुद्यांवर विरोधक सरकारला घेरणार आहेत. राज्यातील व विशेषत: उपराजधानीतील कायदा व सुव्यवस्थेचा मुद्यावरूनदेखील शासनाला विरोधकांकडून ‘टार्गेट’ करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. दुसरीकडे विरोधकांच्या आक्रमणाला परतावून लावण्यासाठी सत्ताधारीदेखील तयारीत आहेत. मंत्र्यांनी आकडेवारीसह सर्व उत्तरे तयार ठेवावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

मंत्री राहणार ‘टार्गेट’विरोधकांकडून मंत्र्यांवरदेखील हल्लाबोल करण्यात येणार आहे. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सोलापुरात आरक्षित जागेवर केलेल्या बंगल्याच्या बांधकामाचा मुद्दा, संभाजी पाटील निलंगेकर यांच्याकडे काम केलेल्या खासगी अंगरक्षकाने घेतलेली हत्येची सुपारी हे मुद्देदेखील विरोधक उचलण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

जनतेचे प्रश्न मांडणारसरकारला सर्वच पातळ्यांवर अपयश आले आहे. जनता हैराण असताना त्याचे मंत्र्यांना काहीही सोयरसूतक नाही. पावसाळी अधिवेशन नागपुरात होत असल्याने विविध समस्यांना वाचा फोडण्याचा आमचा प्रयत्न असेल. नेमक्या कुठल्या मुद्यांना प्राधान्यक्रम द्यायचा हे मंगळवारी होणाऱ्या बैठकीत निश्चित करण्यात येईल.-राधाकृष्ण विखे पाटील, विरोधी पक्षनेते, विधानसभासरकारला जाब विचारणारराज्य शासनाच्या कारभाराचा फटका जनतेला बसतो आहे. शेतकºयांची कर्जमाफीच्या नावावर थट्टा करण्यात आली. शेतकरी, सामान्य माणूस, नोकरदार, दलित, आदिवासींपैकी कुणालाही हे सरकार आपलेसे वाटत नाही. सर्वसामान्य जनतेच्या मुद्यांवर अधिवेशनात आम्ही शासनाला जाब विचारू.-धनंजय मुंडे, विरोधी पक्षनेते, विधान परिषद

टॅग्स :Nagpur Monsoon Session 2018नागपूर पावसाळी अधिवेशन २०१८