शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
7
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
8
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
9
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
10
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
11
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
12
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
13
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
14
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
15
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
16
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
17
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
18
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
19
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
20
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात अल्पवयीन बलात्कारपीडित विद्यार्थिनीने घेतली फाशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 20:25 IST

Nagpur News बलात्कार पीडित अल्पवयीन विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना जरीपटका पोलीस ठाण्यांतर्गत घडली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : बलात्कार पीडित अल्पवयीन विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना जरीपटका पोलीस ठाण्यांतर्गत घडली आहे. (In Nagpur, a minor rape victim was hanged)

१७ वर्षांची अल्पवयीन विद्यार्थिनी अकरावीला शिकत होती. २० वर्षाचा विकास भुजाडे तिचा नातेवाईक आहे. विकासने अल्पवयीन विद्यार्थिनीला लग्नाचे आमिष दाखवून सोबत चलण्यास सांगितले. जून महिन्यात तो तिचे अपहरण करून बंगळूरला घेऊन गेला. मुलगी बेपत्ता झाल्यामुळे तिचे कुटुंबीय चिंतेत सापडले. त्यांच्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी शोध घेतला असता अल्पवयीन विद्यार्थिनी विकास सोबत बंगळूरला असल्याचे समजले. पोलिसांनी बंगळूर येथून विकासला ताब्यात घेऊन अल्पवयीन विद्यार्थिनीची सुटका केली.

तपासात विकासने तिचे शारीरिक शोषण केल्याचा खुलासा झाला. त्या आधारे पोलिसांनी बलात्कार आणि पोक्सो नुसार गुन्हा दाखल केला. शारीरिक संबंध केल्यानंतर अल्पवयीन विद्यार्थिनी गर्भवती झाल्याचे सांगण्यात येत आहे. कुटुंबीयांच्या सहमतीने तिचा गर्भपात करण्यात आला. या घटनेनंतर अल्पवयीन विद्यार्थिनी तणावात राहत होती. चार दिवसांपूर्वी विकास जामिनावर सुटला. अल्पवयीन विद्यार्थिनीच्या कुटुंबात आई वडील आणि लहान भाऊ आहे.

सोमवारी दुपारी सर्वजण बाहेर गेले होते. घरी कोणीच नसल्याचे पाहून अल्पवयीन विद्यार्थिनीने गळफास घेतला. कुटुंबीय घरी पोहोचल्यानंतर त्यांना या घटनेची माहिती समजली. तिच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. तिच्या आईने वडिलांना घटस्फोट दिल्यानंतर तिच्या वडिलांनी दुसरे लग्न केले आहे. परंतु आपल्या पालनपोषणाबद्दल अल्पवयीन विद्यार्थिनीने कधीच तक्रार केली नव्हती. अशा स्थितीत शारीरिक शोषण केल्यामुळे आरोपी जामिनावर सुटल्यामुळे तिने आत्महत्या केली असावी अशी शंका आहे. जरीपटका पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरु केला आहे.

...............

टॅग्स :Deathमृत्यू