शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटूंच्या नावावर नागपूर मेट्रोची चमकोगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 01:21 IST

आंतराष्ट्रीय बॅडमिंटनपटूंची पत्रकार परिषद मिहान येथील मेट्रोच्या डेपोत आयोजित केल्याचा संदेश पाठविण्यात आला. त्यानुसार सर्व पत्रकार आयोजनाच्या ठिकाणी मेट्रोच्या डेपोत पोहचले;

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आंतराष्ट्रीय बॅडमिंटनपटूंची पत्रकार परिषद मिहान येथील मेट्रोच्या डेपोत आयोजित केल्याचा संदेश पाठविण्यात आला. त्यानुसार सर्व पत्रकार आयोजनाच्या ठिकाणी मेट्रोच्या डेपोत पोहचले; मात्र मेट्रो प्रशासनाने तेथे आलेल्या बॅडमिंटनपटूंसोबत स्वत:ची छायाचित्रे काढून पत्रकारांना टाळल्याने मेट्रोची चमकोगिरी दिसून आली.सोमवारी रात्री नागपूर मेट्रोच्या सिव्हिल लाईन्स कार्यालयातून वर्तमानपत्रे आणि टीव्ही चॅनलच्या पत्रकारांना आंतराष्ट्रीय बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधू, सायना नेहवाल, प्रशिक्षक पुलेला गोपीचंद, किदाम्बी श्रीकांत हे खेळाडू मिहान येथील मेट्रोच्या डेपोला भेट देणार असल्याचा संदेश पाठविण्यात आला. तसेच याच ठिकाणी या दिग्गज खेळाडूंची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. मेट्रो प्रशासनाने पत्रकारांना ने आण करण्यासाठी वाहनांची व्यवस्था देखील सिव्हील लाईन्स येथील मेट्रो कार्यालयातून केली. मंगळवारी सकाळी ११ वाजता पत्रकार परिषदेची वेळ संदेशात नमूद होती. विभागीय क्रीडा संकुलात सुरु असलेल्या राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचे वृत्तांकन बाजूला सारून सर्व पत्रकार सिंधू, सायनाच्या पत्रकार परिषदेसाठी मिहान डेपोत पोहचले. तेथे गेल्यावर कळविण्यात आले की सर्व स्टार खेळाडू पत्रकार परिषदेसाठी येतील. मात्र नियोजित वेळेच्या तब्बल एक तास उशिराने नागपूर मेट्रो मिहानच्या डेपोत खेळाडू दाखल झाले. खेळाडू उतरताच मेट्रोचे महाव्यवस्थापक बृजेश दीक्षित यांचे खेळाडूंसोबत फोटो सेशन झाले अन सर्व खेळाडू वाहनात बसून स्टेडियमकडे रवाना झाले. मेट्रोमध्येही खेळाडूंच्या व्यतिरिक्त केवळ मेट्रो प्रशासनातील कुटुंबीयांचे सदस्य दिसत होते. पत्रकारांनी दीक्षित यांना पत्रकार परिषदेबद्दलची विचारणा करताच,‘आम्ही पत्रकार परिषदेचा संदेश पाठविला नाही,’ असे त्यांनी सांगितले. मात्र आंतराष्ट्रीय दर्जाचे खेळाडूंना विना पोलीस सुरक्षा कसे आणले आणि ‘ट्रायल रन’ घेत असलेल्या मेट्रोमध्ये आंतराष्ट्रीय बॅडमिंटनपटूंना कसे बसविले, अशी सर्वसामान्यांमध्ये चर्चा आहे.