शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
2
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
3
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
4
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
5
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
6
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
7
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
8
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
9
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
10
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
11
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
12
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
13
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
14
कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
15
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
16
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
17
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
18
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
19
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
20
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील मेट्रो रेल्वे धावणार; तिकीट दरात ५० टक्के कपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2020 07:00 IST

Metro, Nagpur News नागपुरात मेट्रो रेल्वे सेवा तिकीट दरात ५० टक्के कपातीसह शुक्रवारपासून सुरू होणार असल्याची माहिती महामेट्रोचे महाव्यवस्थापक (ऑपरेशन व मेंटेनन्स) सुधाकर उराडे यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत दिली.

ठळक मुद्देअ‍ॅक्वा शुक्रवारपासून तर ऑरेंज मार्गावर रविवारपासून

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य शासनाच्या मिशन बिगेन अगेन अंतर्गत राज्यातील मेट्रो रेल्वे सेवा सुरळीत होणार आहे. नागपुरात मेट्रो रेल्वे सेवा तिकीट दरात ५० टक्के कपातीसह शुक्रवारपासून सुरू होणार असल्याची माहिती महामेट्रोचे महाव्यवस्थापक (ऑपरेशन व मेंटेनन्स) सुधाकर उराडे यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत दिली.रिच-३ अंतर्गत सीताबर्डी इंटरचेंज ते लोकमान्यनगर मेट्रो स्टेशनदरम्यान अ‍ॅक्वा मार्गावर शुक्रवार १६ ऑक्टोबरपासून आणि रविवार १८ ऑक्टोबरपासून रिच-१ मध्ये ऑरेंज मार्गावर सीताबर्डी इंटरचेंज ते खापरी मेट्रो स्टेशनदरम्यान सकाळी ८ ते रात्री ८ पर्यंत दर १५ मिनिटांनी मेट्रो सेवा सुरू होणार आहे. महामेट्रोतर्फे सर्व मेट्रो ट्रेन आणि स्टेशनचे सातत्याने निजंर्तुकीकरण करण्यात येईल.मेट्रोचे कर्मचारी हॅण्डग्लोव्ह , मास्क परिधान करून असतील. या शिवाय बेबी केअर कक्ष, तिकीट खिडकी, स्टेशन कंट्रोल कक्षाची ठराविक वेळानंतर सफाई करण्यात येईल. याचप्रकारे प्रवाशांच्या सुरक्षेकरिता महामेट्रो सर्व प्रकारची काळजी घेणार आहे. या सर्व उपाययोजनांमुळे मेट्रोने प्रवास करणाऱ्यांचा विश्वास नक्कीच वाढेल. मेट्रो प्रवाशांनीदेखील सहप्रवाशांना कुठलाही त्रास होऊ नये, याकरिता या सर्व सूचना तसेच मानकांचे पालन करावे, असे उराडे यांनी स्पष्ट केले. पत्रपरिषदेत महामेट्रोचे उपमहाव्यवस्थापक (कॉपोर्रेट कम्युनिकेशन) अखिलेश हळवे उपस्थित होते.

 

टॅग्स :Metroमेट्रो