शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या मेडिकलमध्ये भूत...

By admin | Updated: April 10, 2017 23:19 IST

सोशल मीडियावर व्हायरल झाले. या व्हिडीओमुळे मेडिकलच्या कर्मचाऱ्यांची पाचावर धारण बसली आहे

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 10 -  तारीख ७ एप्रिल २०१७...रात्री १.३० वाजता...रुग्णालयात शुकशुकाट... रुग्ण, मृतदेहांना घेऊन जाणारे रिकामे स्ट्रेचर व्हरांड्यात उभे असलेले...अचानक एक स्ट्रेचर चालायला लागले...थोडे सामोर जाऊन थांबले... मागे आले... आणि धडकन सामोर जाऊन एका खांबावर आदळले...नंतर एक कर्मचारी आला...एका खोलीला कुलूप लावले...आणि एका उभ्या स्ट्रेचरला हात लावणार तोच ते स्ट्रेचर चालायला लागगले...तो कर्मचारी घाबरला...पळायला लागला...तिथे दुसरे-तिसरे कोणीच नव्हते! काय होते हे भूताटकी, चेटूक की भास. मात्र हे सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले...सोशल मीडियावर व्हायरल झाले. या व्हिडीओमुळे मेडिकलच्या कर्मचाऱ्यांची पाचावर धारण बसली आहे. नागपूरच्या मेडिकल रुग्णालयात भूत असल्याची अफवा नवी नाही. यापूर्वीही अनेक अफवा पसरल्या. काही आजही बोलल्या जातात. गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेल्या अधिष्ठात्यांच्या बंगल्याला आजही ह्यभूतबंगलाह्ण म्हणून ओळख आहे. रात्रीच्यावेळी शवागाराच्या रस्त्याने कोणीच जात नाही. दिवसाढवळ्या रुग्णालयाच्या आतही अमूक रस्त्यातून गेल्यास झपाटल्यासारखे होते, असे खुद्द कर्मचारी सांगतात. या गोष्टीवर कोणी त्यांना वेडं ठरवितात तर कोणी हसण्यावर नेतात. विशेष म्हणजे, दुसऱ्या एका व्हिडीओत लोखंडाची शिडी अचानक चालायला लागते आणि काही अंतर गेल्यावर थांबते. हे दोन्ही व्हिडीओ गेल्या दोन दिवसांपासून व्हॉटस् अ‍ॅपवर चांगलीच धुमाकूळ घालत आहे. वैद्यकीय अधीक्षकांपासून ते अधिष्ठात्यापंर्यंत याची चर्चा आहे. मात्र दोन-तीन वेळा भूताचा हा व्हिडीओ बघितल्यानंतर मेडिकलचा परिसर नाही, असे म्हणून हसण्यावर नेले जात आहे. मग हा व्हिडीओ कुठला. काही दिवसांपूर्वी हाच व्हिडीओ जे.जे.रुग्णालयातील असल्याचे मुंबईत व्हायरल झाले होते. मात्र हा व्हिडीओ रुग्णालयाचा नाही. जे.जे.रुग्णालयात भूत असल्याची अफवा पसरवली जात आहे, हे सांगण्यास येथील अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांना सामोर यावे लागले. आता हाच व्हिडीओ मेडिकलमधील असल्याचे सांगून ह्यभूतासारखेह्ण व्हॉटस् अ‍ॅपवर फिरत आहे. याला घेऊन रुग्णालयात चर्चेला पेव फुटले आहे. गेल्या दोन दिवसांपासून रात्रीच्यावेळी रुग्णालयात बिनधास्त फिरणारे रुग्णाचे नातेवाईक एकटे-दुकटे फिरत नसल्याचे चित्र आहे.  तयार केलेला व्हिडीओ सीसीटीव्ही सॉफ्टवेअरच्या एका तज्ज्ञाच्या मते हे सीसीटीव्हीचे फुटेज नाही. हा व्हिडीओ तयार केला आहे. कारण सीसीटीव्ही हलत नाही. दुसरे म्हणजे एका व्हिडीओला संगीतही दिले आहे. ही केवळ अफवा आहे.