शहरं
Join us  
Trending Stories
1
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
2
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
3
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
4
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
5
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
6
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
7
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
8
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
9
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
10
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
11
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
12
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
13
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
14
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
15
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
16
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
17
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
18
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
19
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
20
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

नागपूर वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शनचे अधिकार काढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 10:21 IST

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबीने) जाळ्यात अडकलेल्या दोन डॉक्टराच्या प्रकरणाचा धसका घेत नागपूर मेडिकल प्रशासनाने निवासी डॉक्टरांकडून प्रिस्क्रिप्शन लिहून देण्याचे अधिकारच काढून घेतले.

ठळक मुद्देविभागप्रमुख लिहिणार औषधेमेडिकल प्रशासनाचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आपल्या अधिकारापलिकडे जाऊन रुग्णहित जपल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबीने) जाळ्यात अडकलेल्या दोन डॉक्टराच्या प्रकरणाचा धसका घेत मेडिकल प्रशासनाने निवासी डॉक्टरांकडून प्रिस्क्रिप्शन लिहून देण्याचे अधिकारच काढून घेतले. रुग्णालयात औषधे नसल्यास आणि बाहेरुन औषधे लिहून द्यायची असल्यास विभाग प्रमुख, सहयोगी प्राध्यापक किंवा सहायक प्राध्यापकच प्रिस्क्रिप्शन लिहून देतील, असे आदेशच काढले. या निर्णयाने निवासी डॉक्टरांनी सुटकेचा नि:श्वास टाकला असलातरी वरिष्ठांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.मेडिकलच्या नेत्ररोग विभागातील एका रेटीनोपॅथीच्या रुग्णाच्या डोळ्यात इंजेक्शन लावण्यासाठी तीन हजाराची लाच मागण्याच्या प्रकरणाने सर्वत्र खळबळ उडाली. दोष नसतानाही एका निवासी डॉक्टराला तर एका महिला सहायक प्राध्यापकाला ‘एसीबी’च्या कारवाईला सामोरा जावे लागले. मेडिकलची प्रतिमा धुळीस मिळाली ते वेगळेच. यातून धडा घेऊन मेडिकल प्रशासनाने निवासी डॉक्टरांनी प्रिस्क्रिप्शन लिहूनच देऊ नये असे आदेश काढले. विशेष म्हणजे, या आदेशापूर्वी काही वरिष्ठ डॉक्टर रुग्णालयात औषधे असतानाही रुग्णांना बाहेरून औषधे लिहून देण्याचा तर काही निवासी डॉक्टर स्वत:हून बाहेरून औषधे लिहून देत असल्याच्या तक्रारी होत्या. काही वरिष्ठ डॉक्टर स्वत:हून औषधे लिहून देण्याचे टाळत निवासी डॉक्टरांकडून विशिष्ट कंपनीचे औषधे लिहून देण्याचा आग्रह करीत होते. काहींनी तर अशा औषधांची यादीच तयार केली होती. परंतु मेडिकलचे लाचप्रकरण समोर येताच अनेकांचे धाबे दणाणले. काहींनी या प्रकरणांपासून बाहेरुन औषधे लिहून देणेच बंद केले. अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी या सर्व प्रकरणाना आळा बसण्यासाठी प्रत्येक विद्याशाखेच्या विभाग प्रमुखांना, सहयोगी प्राध्यापकांना व सहायक प्राध्यापकांना रुग्णालयात औषधे नसल्यास बाहेरुन औषधे लिहून द्यावे, निवासी डॉक्टरांना प्रिस्क्रिप्शन लिहिण्यास सांगू नये अशा सूचनाच सर्व विभाग प्रमुखांना दिल्याचे समजते.औषधांचा तुटवड्याने विभाग प्रमुख अडचणीतमेडिकलला ‘रेट कॉन्ट्रॅक्ट’वरील (आरसी) औषधे खरेदी करण्याचे अधिकार आहेत. परंतु आॅगस्ट महिन्यात ‘आरसी’ची मुदत संपली. तब्बल पाच महिन्यानंतर शासनाला जाग येऊन १७ जानेवारी रोजी ‘आरसी’ला मुदतवाढ दिली. परंतु ही मुदतवाढ ३१ जानेवारीपर्यंतच होती. यातही या दरम्यान हाफकिन कार्पाेरेशनकडून औषधांचा सुरळीत पुरवठा झाल्यास मुदतवाढ थांबविण्यात येईल, अशी अटही टाकली. सध्या हाफकिन कार्पाेरेशनकडूनच औषधे खरेदी करण्याचे शासनाचे आदेश आहेत. परंतु या कंपनीने रुग्णालयांना अद्यापही आवश्यक साठा उपलब्ध करून दिला नाही. यामुळे सर्वच रुग्णालय अडचणीत आले आहेत. मेडिकलमध्येही बिकट स्थिती आहे. यातच प्रिस्क्रिप्शन लिहून देण्याच्या नव्या आदेशाने वरिष्ठ डॉक्टर अडचणीत आले आहेत.