शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर वैद्यकीय महाविद्यालयात ‘एमसीएच’ पेडियाट्रिक सर्जरीला अखेर मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 10:40 IST

मेडिकलमधील ‘एमसीएच’ पेडियाट्रिक सर्जरी’ला अखेर ‘एमसीआय’ने दोन जागांना मंजुरी दिली. यामुळे आता या अभ्यासक्रमाचा मार्ग मोकळा झाला आहे.

ठळक मुद्दे२००६ पासून प्रयत्न‘एमसीआय’ची दोन जागेला परवानगी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मेडिकलमधील ‘एमसीएच’ पेडियाट्रिक सर्जरी’ला अखेर ‘एमसीआय’ने दोन जागांना मंजुरी दिली. यामुळे आता या अभ्यासक्रमाचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्रात जे.जे. हॉस्पिटल मुंबई, नंतर नागपूर मेडिकलमध्ये हा अभ्यासक्रम सुरू होत आहे. विशेष म्हणजे, मेडिकलच्या ‘एमसीएच प्लास्टिक सर्जरी’ अभ्यासक्रमानंतर हा दुसरा अभ्यासक्रम असणार आहे.मेडिकलमध्ये येणाऱ्या रुग्णांमध्ये बालरोग रुग्णांची संख्याही सर्वाधिक असते. बाह्यरुग्ण विभागात रोज ३०० वर बालरुग्ण असतात. यातील ३० ते ४० टक्के रुग्ण हे शल्यक्रियेचे असतात. आतापर्यंत या शस्त्रक्रिया मेडिकलच्या जनरल सर्जरी विभागाकडून केल्या जायच्या. काही महत्त्वाच्या शस्त्रक्रियेसाठी दिल्ली किंवा मुंबईला पाठविले जायचे. याची दखल तत्कालीन अधिष्ठाता व बालरोग विभागाचे प्रमुख डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी घेतली. त्यांनी ‘एमसीएच पेडियाट्रिक सर्जरी’चा प्रस्ताव नाशीक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडे मंजुरीसाठी पाठविला. मंजुरी प्राप्त होताच या विभागासाठी प्राध्यापक म्हणून डॉ. नीलेश नागदिवे, सहयोगी प्राध्यापक म्हणून डॉ. राजेंद्र सावजी व सहायक प्राध्यापक म्हणून डॉ. चारू शर्मा यांची पदभरती केली. २००६ पासून हा स्वतंत्र विभाग सुरू झाला. याच दरम्यान बालरोग विभागाच्या ‘वॉर्ड क्र. आठ’ ला ‘पेडियाट्रिक सर्जरी’ वॉर्डात रुपांतरित करण्यात आले. तेव्हापासून ‘एमसीएच’ अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. गेल्याच महिन्यात ‘एमसीआय’च्या चमूकडून पाहणी झाली. अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी स्वत:हून यात पुढाकार घेतला होता. अखेर १३ मे रोजी ‘एमसीआय’कडून दोन जागेला मंजुरी देत असल्याचा ई-मेल मेडिकल प्रशासनाला प्राप्त झाला. तब्बल १३ वर्षानंतर सर्वांच्या प्रयत्नाला यश आले. यामुळे आता आजूबाजूच्या राज्यातून येणाऱ्या चिमुकल्यांना आणखी अद्ययावत उपचार मिळून त्यांचा जीव वाचणार आहे.मेडिकलच्या पेडियाट्रिक सर्जरी विभागाने २००६ पासून ते आतापर्यंत सुमारे सात हजार बालकांवर अत्यंत गुंतागुतीच्या शस्त्रक्रिया केल्या. यातील बहुसंख्य शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या. यामुळे गेल्या सात वर्षांत रुग्णांची संख्या दुपटीने वाढल्याचे या विभागाचे प्रमुख डॉ. नीलेश नागदिवे यांनी सांगितले.

राज्यात केवळ ‘पेडियाट्रिक सर्जरी’ नागपुरातराज्यात सर्वात आधी जे.जे. हॉस्पिटल मुंबई येथे या अभ्यासक्रमाला मंजुरी मिळाली. परंतु गेल्या तीन वर्षांपासून विभागाला ‘फॅकल्टी’ मिळाली नाही. परिणामी, हा विभाग बंद पडला आहे. यामुळे राज्यात आता केवळ नागपुरात हा विभाग सुरू आहे.‘एमसीएच प्लास्टिक सर्जरी’ अभ्यासक्रम सुरू होणारे नागपुरातील मेडिकल हे पहिले महाविद्यालय होते. त्यानंतर आता ‘एमसीएच पेडियाट्रिक सर्जरी’ अभ्यासक्रम सुरू होत आहे. ‘एमसीआय’च्या निकषानुसार पायाभूत सोयी उपलब्ध करून देण्यात आल्याने १३ वर्षांच्या प्रयत्नांना यश आले आहे. या अभ्यासक्रमाला दोन जागा मिळाल्याने विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल, सोबतच बालकांना अद्यायावत उपचारही मिळतील.-डॉ. सजल मित्राअधिष्ठाता, मेडिकल

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र