शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

नागपूर महापौरांना हवे ‘एक्स्टेंशन’ : राज्य शासनाला लिहिले पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 00:24 IST

सुमारे दोन महिन्यानंतर महापौर आरक्षणाची सोडत काढण्याची शक्यता आहे. यानंतरच कुठल्या प्रवर्गाचा महापौर असेल हे निश्चित होईल. मात्र अशा स्थितीत विद्यमान महापौर नंदा जिचकार यांना कार्यकाळ वाढवून हवा आहे. यासंदर्भात त्यांनी राज्य शासनाला पत्र लिहून मागणी केली आहे. त्यांच्या जवळ अनेक योजना व काम असून त्यांची पूर्तता करण्यासाठी वेळ कमी असल्याचा युक्तिवाद त्यांनी यात केला आहे.

ठळक मुद्देकाम करण्यासाठी वेळ कमी असल्याचा केला दावा

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : सुमारे दोन महिन्यानंतर महापौर आरक्षणाची सोडत काढण्याची शक्यता आहे. यानंतरच कुठल्या प्रवर्गाचा महापौर असेल हे निश्चित होईल. मात्र अशा स्थितीत विद्यमान महापौर नंदा जिचकार यांना कार्यकाळ वाढवून हवा आहे. यासंदर्भात त्यांनी राज्य शासनाला पत्र लिहून मागणी केली आहे. त्यांच्या जवळ अनेक योजना व काम असून त्यांची पूर्तता करण्यासाठी वेळ कमी असल्याचा युक्तिवाद त्यांनी यात केला आहे.महापौरांनी सुमारे दीड महिन्याअगोदरच कार्यकाळ वाढविण्यासंदर्भात पत्र लिहिले होते. याबाबत गुप्तता बाळगण्यात आली होती. मात्र आता ही बाब समोर आल्यानंतर सत्तापक्षातील नगरसेवक व नेत्यांमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे. कार्यकाळ वाढवायचा की नाही याबाबत राज्य शासनाने अद्याप कुठलाही निर्णय घेतलेला नाही.महापौर बदलण्याचा बनला दबावसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मनपा निवडणुकानंतर महापौरांची निवड होणार होती, तेव्हाच सव्वा वर्षात महापौरपदी नवीन सदस्याची नियुक्ती करावी, असे भाजपाने ठरविले होते. नंदा जिचकार यांचा कार्यकाळ सव्वा वर्षाचा झाल्यानंतरच त्यांना बदलण्यात येईल, अशा चर्चांना पेव फुटले होते. भाजपाच्या विविध गटांमधील नेते त्यांना बदलण्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र नंदा जिचकार यांना हटविण्यात त्यांना यश आले नाही. पुढील दोन महिन्यात त्यांचा कार्यकाळ पूर्ण होणार आहे. मात्र त्यांनी आता सहा महिन्यांची मुदत वाढवून मागितल्याने चर्चांना नव्याने सुरुवात झाली आहे.ही पक्षाची अंतर्गत बाब : महापौरयासंदर्भात नंदा जिचकार यांना विचारणा केली असता त्यांनी असे पत्र लिहिले असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. नागपुरात महापौर परिषदेचे आयोजन होणार आहे. भाजपाचे प्रवक्ता व आ. गिरीश व्यास यांच्या माध्यमातून कार्यकाळ वाढविण्यासंदर्भात पत्र लिहिले आहे. यात काहीच गैर नाही. पत्राला राजकीय वळण देणे अयोग्य आहे. ही पक्षाची अंतर्गत बाब आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.शहराध्यक्षांना काहीच माहीत नाहीआश्चर्याची बाब म्हणजे माजी महापौर व भाजपाचे शहराध्यक्ष प्रवीण दटके यांनी याबाबत आपल्याला काहीच माहीत नसल्याचे स्पष्ट केले आहे. महापौरांचा कार्यकाळ वाढविण्यासंदर्भातील पत्र कुणी कुणाला लिहिले याची काहीच माहिती नाही. त्यामुळे मी यावर बोलणे योग्य होणार नाही, असे त्यांनी प्रतिपादन केले.

टॅग्स :Nanda Jichkarनंदा जिचकारMayorमहापौरNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका