शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात चार लाखाच्या कर्जाच्या नादात साडेचार लाख गमावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 11:01 IST

र लाखाचे कर्ज मिळवण्याच्या नादात एका महिलेने आपले साडेचार लाख रुपये गमविले.

ठळक मुद्देसायबर टोळीकडून महिलेची फसवणूक गिट्टीखदानमध्ये गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चार लाखाचे कर्ज मिळवण्याच्या नादात एका महिलेने आपले साडेचार लाख रुपये गमविले. सायबर टोळीने या महिलेला आधी कर्ज देण्याच्या नावाखाली आणि नंतर तिचे घेतलेले पैसे परत करण्याच्या नावाखाली तिची रक्कम हडपली. प्रमोदिता रामटेके (वय ५२) असे पीडित महिलेचे नाव असून, त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी शनिवारी सायबर टोळीविरुद्ध गुन्हा दाखल केला.रामटेके या गिट्टीखदानमधील व्हेटरनरी कॉलेजच्या मागे राहतात. १२ सप्टेंबर २०१६ ला त्यांना एक फोन आला. फोन करणाऱ्याने आपले नाव आणि पत्ता गिरीश रामचंद्र चंडावले (रा. यशवंत नगर, ज्योतीलिंग सर्व्हिस सेंटर, सांगली) असा सांगितले. आमच्या कंपनीकडून केवळ दोन टक्के व्याजदराने झटपट कर्ज दिले जाते, अशी थाप मारली. चार लाखाचे कर्ज घेण्यासाठी रामटेके यांच्या ई-मेल आयडीवर कर्जासाठी प्रोफार्म पाठविला. तो भरून घेतल्यानंतर आरोपी कुलदीप धर्म पाल (रा. रामसिंग कॉलनी, हेंन्डसी हिस्सार) याचा आणि नंतर अवतारसिंग अनुपमसिंग (रा. विमोपाल अमृतसर, पंजाब) याचा फोन आला. तुमचे कर्ज मंजूर झाले असून, ते तुमच्या खात्यात जमा करण्यासाठी अ‍ॅग्रीमेंट करायचे आहे म्हणून सुरूवातीला जुजबी रक्कम आपल्या खात्यात जमा करायला सांगितली. त्यानंतर सिक्युरिटी फी, लोन इन्शुरन्स तसेच नंतर वेगवेगळ्या नावाखाली आरोपींनी रामटेके यांना रक्कम जमा करायला सांगितली. दीड ते दोन लाख रुपये जमा करूनही आरोपी कर्जाची रक्कम देत नसल्याचे पाहून रामटेके यांनी त्यांना आपली रक्कम परत मागितली. त्यानंतर रक्कम परत करण्याच्या नावाखाली आरोपींनी पुन्हा त्यांच्याकडून वेगवेगळ्या नावाखाली रक्कम हडपणे सुरू केले. १२ सप्टेंबर २०१६ ते २४ आॅगस्ट २०१७ या कालावधीत आरोपींनी आपल्या खात्यात रामटेके यांच्याकडून ४ लाख, २९ हजार, ५०० रुपये जमा करून घेतले. मात्र, त्यांना ना कर्जाची रक्कम दिली ना त्यांचे घेतलेले पैसे परत केले. आरोपी आपल्याला फसवत असल्याचे वर्षभरानंतर ध्यानात आल्याने त्यांनी गिट्टीखदान पोलिसांकडे आरोपींची तक्रार नोंदवली. पोलिसांनी प्रदीर्घ चौकशी करून फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.आरोपी संपर्क क्षेत्राबाहेररामटेके यांनी नंतर रक्कम देण्यास नकार देऊन पोलिसांकडे तक्रार करण्याचा धाक दाखवताच आरोपींनी रामटेकेंसोबत आपला संपर्क तोडला. अलीकडे त्यांचे सर्व संपर्क क्रमांक संपर्क क्षेत्राबाहेर असल्याची कॅसेट ऐकू येते. गिट्टीखदान पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइम