शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
3
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
4
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
5
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
6
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
7
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
8
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
9
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
11
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
12
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
13
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
14
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
15
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
16
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
17
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
18
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
19
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
20
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!

नागपुरातील उमेदवारांचे सरासरी वय ४८ वर्षे; सर्वांत तरुण उमेदवार ‘३०’चा, तर वयस्क ‘७७’ चे 

By योगेश पांडे | Updated: April 2, 2024 23:55 IST

Loksabha Election 2024; तरुणतुर्कांचे प्रस्थापितांना आव्हान, निवडणूक आयोगातर्फे उमेदवारांच्या वयाचा तपशील उपलब्ध करून देण्यात आला आहे. ‘लोकमत’ने सर्व उपलब्ध शपथपत्रांची विस्तृत पाहणी केली असता वरील बाब समोर आली आहे

नागपूर : साधारणत: पन्नाशी उलटल्यानंतरच खऱ्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात होते. निवडणुकांत उतरण्याची सुरुवात या टप्प्यानंतर होते असे एरवी म्हणतात. मात्र, गेल्या काही काळापासून ही धारणा मोडीत निघाली असून नागपूर लोकसभा मतदारसंघातील बहुतांश उमेदवार हे पन्नाशीच्या आतीलच आहेत. जर एकूण सरासरी काढली तर नागपुरातील उमेदवारांचे सरासरी वय हे ४८ वर्षे इतके आहे. २०१९ च्या निवडणुकीत हेच सरासरी वय ४६ इतके होते. नागपुरातील सर्वांत तरुण उमेदवार हा ३० वर्षांचा आहे, तर सर्वांत वयस्क उमेदवार ७७ वर्षांचे आहेत, हे विशेष.

निवडणूक आयोगातर्फे उमेदवारांच्या वयाचा तपशील उपलब्ध करून देण्यात आला आहे. ‘लोकमत’ने सर्व उपलब्ध शपथपत्रांची विस्तृत पाहणी केली असता वरील बाब समोर आली आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघातून एकूण २६ उमेदवार भाग्य अजआवत आहेत. मागील अनेक निवडणुकांपासून तरुण मतदारांमध्ये बरीच जागृती आली आहे. तरुणाईच्या मतांना महत्त्व आले असून यामुळेच राजकीय पक्षांचा चेहरादेखील तरुण होत आहे. त्याप्रमाणे अपक्ष म्हणून उतरण्यासाठीदेखील पन्नाशीच्या आतील उमेदवारांमध्ये उत्सुकता दिसून आली. नागपुरातील १४ (५४ टक्के) उमेदवार हे ५० हून कमी वय असलेले आहेत, तर ६ (२३ टक्के) उमेदवारांचे वय हे चाळीस किंवा त्याहून कमी आहे. तिशीचे दोन उमेदवार रिंगणात आहेत.

चाळिशीच्या आतील चार अपक्षमतदारसंघात चाळिशीच्या आतील २३ टक्के उमेदवार रिंगणात आहेत. यातील ६६ टक्के उमेदवार हे पक्ष आहेत, तर राजकीय पक्षांकडून चाळिशीच्या आत वय असलेला केवळ एकच उमेदवार उतरविण्यात आला आहे, तर चाळिशीच्या आतील अवघा एक अपक्ष उमेदवार निवडणुकीत उभा ठाकला आहे. ११ अपक्ष उमेदवारांपैकी ३ (२७ टक्के) उमेदवार हे ४१ ते ५० या वयोगटातील आहेत, तर चार उमेदवार हे पन्नाशीहून अधिक वयाचे आहेत.

वयानुसार उमेदवारांची संख्यावय उमेदवार२५ ते ३० : २३१ ते ४० : ६४१ ते ५० : ८५१ ते ६० : ८६० हून अधिक : २

चार उमेदवारांविरोधात गुन्हेराजकीय पक्षांच्या उमेदवारांविरोधातील गुन्हे हा मागील काही काळापासून चर्चेचा विषय आहे. नागपूर मतदारसंघात उभे असलेल्या चार उमेदवारांविरोधात विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. यातील बहुतांश गुन्हे हे आंदोलनांशी निगडित किंवा राजकीय स्वरूपाचे आहेत. या चार उमेदवारांविरोधात एकूण १६ खटले सुरू आहेत.

टॅग्स :nagpur-pcनागपूरElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग