शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर लोकसभा निवडणूक निकाल २०१९; जनतेने दाखविलेल्या विश्वासाबद्दल ऋणी आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 16:59 IST

लोकसभेसाठी झालेल्या मतदानाच्या मोजणीतल्या पाचव्या फेरीतच ६८ हजारांची आघाडी घेतलेले भाजपचे उमेदवार नितीन गडकरी यांनी काही वेळापूर्वीच नागपुरात पत्रकारांशी बातचीत केली. त्याचा गोषवारा देत आहोत.

ठळक मुद्देकटुता विसरून पुन्हा सगळे मिळून काम करायला हवे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: लोकसभेसाठी झालेल्या मतदानाच्या मोजणीतल्या पाचव्या फेरीतच ६८ हजारांची आघाडी घेतलेले भाजपचे उमेदवार नितीन गडकरी यांनी काही वेळापूर्वीच नागपुरात पत्रकारांशी बातचीत केली. त्याचा गोषवारा देत आहोत.देशाच्या विकासासाठी जनतेने भारतीय जनता पार्टीला जी पुन्हा संधी दिली त्याबद्दल मी देशाच्या जनतेचा मनापासून आभारी आहे. गेल्या पन्नास वर्षात जे झालं नाही ते मोदींच्या सरकारने करून दाखवलं. येत्या काळात भारत निश्चितच जगातली एक मोठी आर्थिक सत्ता बनेल. यात शेतकरी, मजूर, गरीब वर्ग, वंचित घटक यांचा विचार प्रामुख्याने केला जाईल.नागपूरच्या जनतेने माझ्यावर पुन्हा एकदा विश्वास टाकला त्याकरिताही मी जनतेचा आभारी आहे. लोकशाहीत या कौलाला स्वीकारणे गरजेचे आहे.निवडणूक आयोगाने निष्पक्ष निवडणुका घेतल्या आहेत. मात्र आपल्याकडे पद्धत आहे की, जिंकली तर जनतेचा कौल आणि पराभव झाला तर इव्हीएम घोटाळा म्हणायचे. पण जनतेचा कौल सर्वांनी स्वीकारावा. निवडणुका हा लोकशाहीचा मोठा उत्सव आहे. त्यात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले. मी विरोधी पक्षात काम केलं आहे. ती भूमिका निभवावी लागते. त्यामुळे कुणी संन्यास घेण्याची भाषा करू नये. पुढे सगळ््यांनीच मिळून काम करायचं आहे.काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांनी मतमोजणीबाबत घेतलेल्या आक्षेपाविषयी विचारलेल्या प्रश्नाला, त्यांनी आपल्याला काहीच म्हणायचं नाही असे उत्तर दिले.यंदा निवडणुकीतील प्रचारात भाषेचा स्तर खाली आल्याकडे लक्ष वेधले तेव्हा त्यांनी, जनता दोन्ही पक्षांचे ऐकून निर्णय देत असते, मात्र गुणात्मक सुधारणेसाठी सर्वांनी पालन करावे. पंतप्रधान चोर आहे, अशा प्रकारची भाषा योग्य नाही.२०१४ मध्ये नागरिकांत नाराजी होती. त्यामुळे त्यांनी नरेंद्र मोदी यांची निवड केली. मोदी सरकारने गेल्या पाच वर्षात एक स्थिर सरकार देशाला दिलं आहे. हे सरकार विकासाभिमुख आहे. आम्ही विदर्भातील पाण्याचा मुख्य प्रश्न येत्या काळात हाताळणार आहोत, असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरादाखल मत व्यक्त केले.

 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालNitin Gadkariनितीन गडकरी