शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
2
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
3
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
4
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन
5
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
6
India Pakistan War: पाकिस्तानचा रडीचा डाव, अंधार पडताच केला हल्ला; काय काय घडलं, पहा व्हिडीओ
7
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...
8
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला; पाकने राजस्थान बॉर्डरच्या दिशेने पाठवले रणगाडे, भारतीय सैन्यही सज्ज
9
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
10
ऑपरेशन सिंदूरबाबत मोठी अपडेट! भारताने हल्ल्यात दोन पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली
11
पाकिस्तान सुधरेना, जम्मू विमानतळावर हल्ल्याचा प्रयत्न, नियंत्रण रेषेपलीकडून भीषण गोळीबार
12
भारताने हाणून पाडला 'नापाक' हल्ल्याचा प्रयत्न! 'या' ठिकाणी पाकिस्तानची मिसाईल्स केली नष्ट
13
Video: सायरन वाजले!! पाकिस्तानची ८ मिसाईल्स भारताने पाडली, 'नापाक' हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर
14
IPL 2025 PBKS vs DC : पंजाब-दिल्ली यांच्यातील सामना अचानक थांबवण्याची वेळ: नेमकं काय घडलं?
15
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
16
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
17
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
18
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणीवर सामूहिक बलात्कार
19
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
20
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   

नागपूर लोकसभा निवडणूक निकाल २०१९; आज होणार नागपूर-रामटेकचा फैसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 06:00 IST

लोकसभा निवडणुकांचे बहुप्रतिक्षित निकाल गुरुवारी जाहीर होणार असून नागपूर व रामटेक लोकसभा मतदारसंघात मतदार राजाने नेमका कुणाला कौल दिला आहे हे स्पष्ट होणार आहे.

ठळक मुद्देकोण होणार सिकंदर; गडकरी की पटोले, तुमाने की गजभिये ?सर्वच पक्ष आशावादी कार्यकर्त्यांप्रमाणेच जनतेमध्येदेखील उत्सुकता

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभा निवडणुकांचे बहुप्रतिक्षित निकाल गुरुवारी जाहीर होणार असून नागपूररामटेक लोकसभा मतदारसंघात मतदार राजाने नेमका कुणाला कौल दिला आहे हे स्पष्ट होणार आहे. मागील सव्वा महिन्यापासून निकालांबाबत वेगवेगळे कयास लावले जात होते. आता कुणाचे दावे खरे ठरले व कुणाचे आकडे हवेत विरले यावरून पडदा हटणार आहे. साधारणत: दुपारनंतर कल लक्षात येणार असला तरी निकालाचे अंतिम आकडे हाती यायला वेळ लागणार आहे.विशेषत: नागपूर मतदारसंघाकडे तर संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. एकीकडे भाजपाकडून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तर दुसरीकडे काँग्रेसचे नाना पटोले अशी येथे लढत आहे. तर दुसरीकडे रामटेकमधून विद्यमान खासदार सेनेचे कृपाल तुमाने व काँग्रेसचे किशोर गजभिये यांच्यात थेट सामना आहे. वृत्तवाहिन्यांवरील ‘एक्झिट पोल्स’नंतर नागपूर-रामटेकचा गड युती राखणार की आघाडी अनपेक्षित धक्का देणार याबाबतची उत्सुकता वाढली आहे.कळमना मार्केट यार्डमध्ये गुरुवारी सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल व साधारणत: दुपारपर्यंत कलाचे चित्र स्पष्ट होईल. निवडणुकीत नागपूर लोकसभा मतदारसंघातून ३० उमेदवार नशीब अजमावत असून त्यात नितीन गडकरी, नाना पटोले यांच्यासह बसपाचे मोहम्मद जमाल, वंचित बहुजन आघाडीचे मनोहर ऊर्फ सागर डबरासे, ‘बीआरएसपी’चे अ‍ॅड.सुरेश माने हेदेखील रिंगणात आहेत. निवडणुकांच्या तारखेची घोषणा होण्याअगोदरच नागपूरचे राजकीय वातावरण तापले होते. प्रचारादरम्यान विविध पक्षाच्या नेत्यांनीदेखील नागपुरात उपस्थिती लावून जाहीर सभांच्या माध्यमातून मतदारांना साद घातली. ११ एप्रिल रोजी नागपूर लोकसभा मतदारसंघातील २ हजार ६५ मतदानकेंद्रांवर ५४.७४ टक्के मतदारांनी मतदान केले होते. आता मतदारांनी आपली पसंती कुणाला दिली आहे व विजयाची माळ कुणाच्या गळ््यात पडणार यावरून गुरुवारी पडदा उठणार आहे. दरम्यान, मतमोजणीसाठी प्रशासनाची जय्यत तयारी झाली असून पोलिसांचादेखील कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.नागपूर लोकसभाएकूण उमेदवार ३०एकूण मतदार २१,६०,२३२झालेले मतदान ११,८२,५०७टक्केवारी ५४.७४ %प्रमुख उमेदवारनितीन गडकरी (भाजप)नाना पटोले (काँग्रेस)मोहम्मद जमाल (बसपा)सागर डबरासे (वंचित बहुजन आघाडी)

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019nagpur-pcनागपूरramtek-pcरामटेक