शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

मागासवर्गीय महिलांवरील अत्याचारात नागपूर आघाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 21:52 IST

राज्याची उपराजधानी असलेले नाागपूर हे समरसता नांदणारे शहर म्हणून ओळखले जाते. मात्र, मागासवर्गीय महिलांवरील अत्याचाराची आकडेवारी पाहता नागपूरची मान लाजेने खाली घालण्याची वेळ आली आहे. अनुसूचित जातीच्या माहिलांवरील अत्याचाराच्या घटनेत नागपूर आघाडीवर आहे.

ठळक मुद्देअनूसूचित जाती आयोगाच्या सदस्या स्वराज विद्वान यांची नाराजी२ वर्षात २६ महिलांवर अत्याचार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्याची उपराजधानी असलेले नाागपूर हे समरसता नांदणारे शहर म्हणून ओळखले जाते. मात्र, मागासवर्गीय महिलांवरील अत्याचाराची आकडेवारी पाहता नागपूरची मान लाजेने खाली घालण्याची वेळ आली आहे. अनुसूचित जातीच्या माहिलांवरील अत्याचाराच्या घटनेत नागपूर आघाडीवर आहे. २०१६-१७ व २०१७-१८ या दोन वर्षात बलात्काराच्या २६ घटना घडल्या़ असून अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत त्यात कारवाई सुरू आहे़, अशी माहिती अनुसूचित जाती आयोगाच्या सदस्या स्वराज विद्वान यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती सभागृहात जिल्ह्यातील अनुसूचित जातींसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा राष्ट्रीय आयोगाच्या सदस्या स्वराज विद्वान यांनी घेतला. यावेळी जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. श्रीमती कादंबरी बलकवडे, सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त विजय वाकुलकर, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. डॉ. स्वराज विद्वान यांनी जिल्ह्यातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी सुरु असलेल्या वसतिगृहांना भेट देऊन पाहणी केली. तसेच येथे उपलब्ध असलेल्या सुविधांची माहिती घेतली. त्यानंतर विभाग प्रमुखांच्या बैठकीत विद्यार्थ्यांना आवश्यक असलेल्या सुविधा, पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याबद्दल सूचना दिल्यात.यानंतर पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या, अनुसूचित जातीच्या महिलांवर होणारे अत्याचार वाढले आहे़ जातीय विद्वेषातून हत्याही होत आहेत़ हत्यांच्या घटना पुणे, मुंबई या भागात अधिक दिसून येतात़ आयोगाकडे पूर्वी ५१ हजार प्रकरणे प्रलंबित होती़ ती निकाली काढली जात आहे़ एका दिवसात किमान ५०० तक्रारी आयोगाकडे येत आहेत. वसतिगृहात सर्व सोईसुविधा उपलब्ध करून द्याव्या, असे निर्देश जिल्हाधिकारी व जिल्हा प्रशासनाला दिले़ जातीय विद्वेषातून हत्येची दोन प्रकरणे नागपुरात घडली होती़ त्यांच्या कुटुंबातल एकाला नोकरी देण्याबाबत कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे स्वराज यांनी सांगितले़वसतिगृहांची स्वच्छता नाही स्वराज विद्वान यांनी बी़ सी़ गर्ल्स होस्टेल, नांदा बॉईज होस्टेल, मुक्ताबाई गर्ल्स होस्टेल या तीन वसतिगृहांची पाहणी केली़ येथे अनेक सोईसुविधांचा अभाव असल्याचे आढळून आले़ नियमित स्वच्छता केली जात नसून जिमचे साहित्यही तुटलेले आढळले. वसतिगृहात पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याचेही दिसून आले. यावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

टॅग्स :WomenमहिलाAtrocity Actअॅट्रॉसिटी कायदा