शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात होणार १८ हजार कोटींची गुंतवणूक

By admin | Updated: May 15, 2017 02:20 IST

‘स्मार्ट सिटी विथ मेट्रो’ म्हणून उदयाला येत असलेल्या नागपूरच्या विकासाचा वेग आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.

अनिल अग्रवाल यांच्या ‘वेदांता’ समूहाचा पुढाकार : गडकरींच्या लंडन भेटीचे नागपूरला ‘गिफ्ट’ लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ‘स्मार्ट सिटी विथ मेट्रो’ म्हणून उदयाला येत असलेल्या नागपूरच्या विकासाचा वेग आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. ब्रिटनमध्ये मुख्यालय असणाऱ्या ‘वेदांता’ समूहातर्फे नागपुरातील बुटीबोरी येथे १८ हजार कोटींच्या गुंतवणुकीच्या माध्यमातून ‘एलसीडी पॅनल’ निर्मितीचा प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी हे लंडन दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी ‘वेदांता’ समूहाचे चेअरमन अनिल अग्रवाल यांनी गडकरींची भेट घेऊन नागपुरात गुंतवणूकीबाबत चर्चा केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. देशातील हा अशा प्रकारचा पहिलाच मोठा प्रकल्प ठरणार आहे हे विशेष. गेल्या काही काळापासून जागतिक गुंतवणूकदारांची नागपूरकडे नजर लागली आहे. ‘वेदांता’ हा जागतिक पातळीवरील धातू व खाणक्षेत्रातील आघाडीचा समूह आहे. नितीन गडकरी लंडन दौऱ्यावर गेले असताना अनिल अग्रवाल यांनी त्यांची भेट घेतली. आपल्याला नागपुरात २५ हजार कोटींची गुंतवणूक करायची असून सुरुवातीला ‘इलेक्ट्रॉनिक्स स्क्रीन’ निर्मितीचा प्रकल्प सुरू करायचा आहे. यासाठी १८ हजार कोटींची गुंतवणूक करण्याची तयारी असल्याचे अग्रवाल यांनी गडकरी यांना सांगितले. गडकरी यांनीदेखील बुटीबोरीत जागा उपलब्ध असून यासंदर्भात शासनातर्फे सहकार्य करण्यात येईल, असे सांगितले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील महिन्यात अनिल अग्रवाल नागपुरात येणार असून यावेळी ते जागेची पाहणी करतील. या भेटीतच गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करारदेखील होणार आहे. ‘वेदांता’च्या ‘टीम’ने केली आहे पाहणी या प्रकल्पासाठी ‘वेदांता’ समूहाची अनेक महिन्यांपासून तयारी सुरू आहे. समूहाच्या पथकाने मिहान व बुटीबोरीला भेट दिली होती. या प्रकल्पासाठी २०० एकरहून अधिक जागा लागणार आहे. विदर्भातील ‘टंगस्टन’ खाणींमध्ये रस नागपूरप्रमाणे विदर्भातदेखील अग्रवाल यांना गुंतवणुकीला वाव असल्याचे गडकरी यांनी या भेटीत सांगितले. नागपुरात ‘टंगस्टन’च्या काही खाणी बंद पडल्या असून भूगर्भशास्त्र व खनिकर्म संचालनालयानुसार नागपूर जिल्ह्यातील कुही, खोबना, आगरगाव, रानबोडी, कोलारी-भोवरी इत्यादी भागांत ‘टंगस्टन’ धातूपाषाणाचा मुबलक साठा आहे.अनिल अग्रवाल यांनी या खाणींमध्ये रस दाखविला आहे.