शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात ‘अ‍ॅट्रॉसिटी’चे सर्वाधिक गुन्हे नागपुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2020 07:00 IST

atrocities, Nagpur News समाज आधुनिकतेकडे जात असला तरी जातीपातीचा भेद कायमच असून मागील तीन वर्षांत उपराजधानीमध्ये ‘अ‍ॅट्रॉसिटी’च्या गुन्ह्यांची संख्या वाढतच असल्याचे चित्र आहे. २०१७ च्या तुलनेत २०१९ मध्ये दुप्पट गुन्हे दाखल झाले.

योगेश पांडेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या नागरिकांवर अत्याचार करणे किंवा सामाजिक प्रतिष्ठेला अवमान करण्याबाबत ‘अ‍ॅट्रॉसिटी’चा गुन्हा दाखल करण्यात येतो. समाज आधुनिकतेकडे जात असला तरी जातीपातीचा भेद कायमच असून मागील तीन वर्षांत उपराजधानीमध्ये ‘अ‍ॅट्रॉसिटी’च्या गुन्ह्यांची संख्या वाढतच असल्याचे चित्र आहे. २०१७ च्या तुलनेत २०१९ मध्ये दुप्पट गुन्हे दाखल झाले. दुर्दैवाची बाब म्हणजे यातदेखील महिला अत्याचाराचेच सर्वात जास्त गुन्हे आहेत.‘एनसीआरबी’च्या २०१९ सालच्या अहवालातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे. २०१९ साली नागपुरात ‘अ‍ॅट्रॉसिटी’चे एकूण ५६ गुन्हे दाखल करण्यात आले. २०१७ मध्ये हीच संख्या २८ तर २०१८ मध्ये २४ इतकी होती. तीन वर्षांत दाखल गुन्ह्यांमध्ये तब्बल १०० टक्क्यांनी वाढ झाली आहे. २०१९ मध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये मोठ्या शहरांत नागपूरचा राज्यात पहिला तर देशात नववा क्रमांक आहे. आश्चर्याची बाब म्हणजे राज्याची राजधानी असलेल्या मुंबईच्या तुलनेत नागपुरात जास्त गुन्हे दाखल झाले.

‘अ‍ॅट्रॉसिटी’अंतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये महिला अत्याचाराच्या तब्बल २८ गुन्ह्यांचा समावेश आहे. तर अल्पवयीन मुलींवर अत्याचारासाठी ‘पोक्सो’अंतर्गत दाखल झालेल्या १६ प्रकरणांचा समावेश होता. ‘अ‍ॅट्रॉसिटी’च्या विविध गुन्ह्यांसाठी दहा महिलांसह एकूण ८५ जणांना अटक झाली. यातील ५५ जणांविरोधात चार्जशीट दाखल करण्यात आली.शिक्षेचे प्रमाण ठरले शून्यपोलिसांकडून २०१९ मध्ये एकूण ८८ गुन्ह्यांची चौकशी झाली. यात २०१८ च्या प्रलंबित असलेल्या ३३ प्रकरणांचा समावेश होता. न्यायालयात ‘अ‍ॅट्रॉसिटी’अंतर्गत ३६ खटले दाखल करण्यात आले. या कालावधीत जुन्या तसेच तत्कालीन दाखल अशा १६४ खटल्यांवर सुनावणी झाली. यात एकालाही शिक्षा झाली नाही तर ३३ प्रकरणांत ७७ जणांची निर्दोष मुक्तता झाली.राज्यातील गुन्हेशहर              - गुन्हेनागपूर            - ५६मुंबई               - ५३पुणे                 - ३६ 

 

टॅग्स :Courtन्यायालय