शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

नागपुरात बोगस मतदान झालेच : एकाच्या नावावर दुसऱ्यानेच केले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 00:57 IST

प्रशासनाने पारदर्शी निवडणूक प्रक्रिया राबविण्याचा प्रयत्न केला असतानाही बोगस मतदान झाल्याचे प्रकार समोर आले. मतदार जेव्हा मतदानासाठी केंद्रावर पोहचले तेव्हा त्यांच्या जागी आधीच दुसऱ्या बोगस मतदाराने मतदान केल्याचे निदर्शनास आले. याबाबतची आपली तक्रारही निवडणूक अधिकाऱ्यांनी ऐकून घेतली नाही, अशी तक्रार या मतदारांनी केली आहे.

ठळक मुद्देयंत्रणेने न्याय न दिल्याची तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रशासनाने पारदर्शी निवडणूक प्रक्रिया राबविण्याचा प्रयत्न केला असतानाही बोगस मतदान झाल्याचे प्रकार समोर आले. मतदार जेव्हा मतदानासाठी केंद्रावर पोहचले तेव्हा त्यांच्या जागी आधीच दुसऱ्या बोगस मतदाराने मतदान केल्याचे निदर्शनास आले. याबाबतची आपली तक्रारही निवडणूक अधिकाऱ्यांनी ऐकून घेतली नाही, अशी तक्रार या मतदारांनी केली आहे.बबलू सोमकुंवर हे नारा येथे राहतात. व्होटर लिस्टमध्ये त्यांचे नाव आहे. पण ते नारा येथील मतदान केंद्रात मतदानासाठी गेले असता, त्यांना सांगण्यात आले की त्यांचे मतदान झाले आहे. बूथ क्रमांक ५५ व अनुक्रमांक ५२३ मध्ये ललित सुनील मेश्राम यांच्यासोबतसुद्धा असाच प्रकार घडला. ते जरीपटका येथील महात्मा गांधी शाळेत मतदान करण्यास गेले होते. पण त्यांचे मतदान झाल्याचे सांगण्यात आले. निर्मला कॉन्व्हेंटमध्ये मतदान करण्यास गेलेले सोनू डोईफोडे यांनासुद्धा मतदान झाल्याचे सांगण्यात आले. त्यांनी मतदान अधिकाऱ्यांना तक्रारही केली. आता काहीच करता येणार नसल्याचे सांगून त्यांना परत पाठविण्यात आले. काँग्रेसचे नेता मिलिंद सोनटक्के यांनी आरोप केला की, मोठ्या प्रमाणात बोगस मतदान झाले आहे. प्रशासनाने प्रकरणाची गंभीर चौकशी करणे गरजेचे आहे. ओळखपत्र आवश्यक असतानाही कुणीही कुणाच्याही नावावर मतदान कसे करू शकते, असा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे.विदर्भ बुनियादीतही दुसऱ्याच्या नावावर मतदानअमोल सुरेश काकडे रा. ओमनगर, सक्करदरा आणि शारदा राजेश गेडाम रा. जुनी शुक्रवारी या दोन्ही मतदाराचे मतदान विदर्भ बुनियादी हायस्कूल, मीरची बाजार येथे होते. परंतु यांच्या नावावर दुसऱ्यांनीच कोणी मतदान केले होते. याची तक्रार किंग कोबरा ऑर्गेनायझेन युथ फोर्सचे संस्थापक अरविंदकुमार रतुडी यांच्याकडे त्यांनी केली. रतुडी यांनी मतदान केंद्र अधिकारी व पोलिसांना याची माहिती दिली. परंतु समाधान होऊ शकले नाही. याबाबत आता ते रितसर पोलिसांकडे तक्रार करणार आहेत, असे रतुडी यांनी ‘लोकमत’ला सांगितले..प्रतापनगरात बोगस मतदानदक्षिण पश्चिम नागपुरात दोन मतदान केद्रांवर बोगस मतदान झाल्याची तक्रार प्राप्त झाली. प्रतापनगरातील स्कूल ऑफ स्कॉलर्स मधील बूथ क्रमांक ५२ येथे स्वप्निल तितरे यांच्या नावावर अगोदरच मतदान झाले होते. तर आयटी पार्क येथील प्रादेशिक कामगार संस्थेतील मतदान केंद्रातील बूथ क्रमांक ११३ वर सचिन कटारे यांच्या नावावर बोगस मतदान झाले. मतदान केंद्रावर गेल्यानंतर ही बाब समोर आली. जोगीनगर येथील मतदान क्रमांक २३९ वर पार्वती बोंदरे ही महिला मतदान करण्यासाठी आली. मात्र त्यांच्या नावावर अगोदरच कुणीतरी मत दिले होते. बोंदरे या हस्ताक्षर करु शकतात, मात्र त्यांच्या नावासमोर कुणीतरी अंगठा लावून चालले गेले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnagpur-pcनागपूरMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019