शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय; उपचारापेक्षा औषधे महाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 10:08 IST

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) दारिद्र्य रेषेखालील रुग्णांना मोफत उपचाराचा नियम आहे. त्यानुसार आजाराचे निदान करणारे ‘सिटी स्कॅन’ व ‘एमआरआय’ची तपासणी नि:शुल्क केली जाते. परंतु या तपासणीपूर्वी दिले जाणाऱ्या ‘डाय’चा तुटवडा पडला आहे.

ठळक मुद्देसिटी स्कॅन, ‘एमआरआय’साठी दिल्या जाणाऱ्या ‘डाय’चा तुटवडा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) दारिद्र्य रेषेखालील रुग्णांना मोफत उपचाराचा नियम आहे. त्यानुसार आजाराचे निदान करणारे ‘सिटी स्कॅन’ व ‘एमआरआय’ची तपासणी नि:शुल्क केली जाते. परंतु या तपासणीपूर्वी दिले जाणाऱ्या ‘डाय’चा तुटवडा पडला आहे. बाजारात याची किमत ८०० ते १४०० रुपयांपर्यंत आहे. रुग्णांना पदरमोड करून इंजेक्शन विकत घ्यावे लागत आहे.शासकीय रुग्णालयांमध्ये एकीकडे अद्ययावत यंत्रणा व विविध विभाग उघडले जात असले तरी गरीब रुग्णांच्या हक्काच्या सोयी उपलब्ध करून दिल्या जात नसल्याने आरोग्याची परिस्थिती बिकट होत चालली आहे. दिवसेंदिवस नवनवे आजार, आजाराची गुंतागुंत यामुळे अद्ययावत यंत्रणेचा वापर होत आहे. विशेष म्हणजे, आता प्रत्येक मोठ्या रुग्णालयात सिटी स्कॅन व एमआरआय महत्त्वाचे झाले आहे. मेडिकलमध्ये ही दोन्ही उपकरणे आहेत. या उपकरणाद्वारे आतील अवयव किंवा विशिष्ट भाग किंवा ऊती इत्यादींची प्रतिमा, एकाच भागाच्या वेगवेगळ्या कोनातून अनेक प्रतिमा घेतल्या जातात. यातील अचूक रोगनिदान करण्याकरिता विशिष्ट रसायनांचा ‘डाय’चा उपयोग होतो. या रसायनांना ‘कॉन्ट्रास्ट एजंट’ही म्हणतात. या ‘डाय’मुळे आतील भागात निर्माण झालेली असाधारण स्थिती (रोगाच्या दृष्टीने) साधारण स्थितीपेक्षा वेगळी दिसण्यास या रसायनाचा उपयोग होतो. परंतु मेडिकलमध्ये गेल्या दोन महिन्यापासून याचा तुटवडा असल्याने गंभीर आजाराच्या रुग्णांना वेळेवर धावाधाव करून ‘डाय’ आणावा लागत आहे.दोन महिन्यापासून ‘डाय’ नाहीमेडिकलमध्ये सिटी स्कॅन किंवा एमआरआय करण्यासाठी गेलेल्या ‘बीपीएल’च्या रुग्णांना स्थानिक खरेदी करून नि:शुल्क ‘डाय’ पुरविण्याचे नियम आहेत. परंतु नियमांना बगल देत ‘बीपीएल’सह सर्वच रुग्णांना बाहेरून डाय खरेदी करण्यासाठी वेळेवर चिठ्ठी लिहून दिली जात आहे. विशेष म्हणजे, सिटी स्कॅनला लागणारी ‘डाय’ ही ८०० ते १४०० रुपयांमध्ये तर एमआरआयसाठी लागणारी ‘डाय’ ही १८०० रुपये किमतीला मिळते. अनेक गरीब रुग्णांना हा खर्चही झेपत नसल्याने ते अडचणीत आले आहेत.

टॅग्स :Government Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय