लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी मंगळवारी मास्क शिवाय फिरणाऱ्या ६४९ नागरिकांविरुद्ध कारवाई करून त्यांच्याकडून १ लाख २९ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल केला. मागील पाच दिवसात शोध पथकांनी १७८५ नागरिकांविरुद्ध कारवाई करून ३ लाख ५७ हजारांचा दंड वसूल आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून मृतांची संख्यासुध्दा झपाट्याने वाढत आहे. नागरिकांना कोरोनापासून बचाव करण्यासाठी वारंवार मास्क लावणे, सामाजिक अंतराचे पालन करणे, हात स्वच्छ धुणे अशा सूचना मनपा प्रशासनातर्फे केल्या आहे. परंतु नागरिकांनी सूचनांचे पालन न केल्यामुळे पथकाचे १८० जवानांनी शोध पथकाचे प्रमुख वीरसिंग तांबे यांच्या मार्गदर्शनात कारवाई करुन दंड वसूल केला. शहर पोलिसांंनी सुध्दा धरमपेठ, नेहरुनगर आणि धंतोली झोन अंतर्गत मास्कशिवाय फिरणाऱ्या बेजबाबदार नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली.झोननिहाय कारवाईलक्ष्मीनगर - ५८धरमपेठ - २०४हनुमाननगर - ३५धंतोली -५८नेहरुनगर - ३४गांधीबाग -४०सतरंजीपूरा - २४लकडगंज - १३आशीनगर - ४३मंगळवारी - १३५मनपा मुख्यालय - ५
नागपुरात मास्क न लावणाऱ्या ६४९ नागरिकांकडून दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 00:46 IST
महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी मंगळवारी मास्क शिवाय फिरणाऱ्या ६४९ नागरिकांविरुद्ध कारवाई करून त्यांच्याकडून १ लाख २९ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल केला. मागील पाच दिवसात शोध पथकांनी १७८५ नागरिकांविरुद्ध कारवाई करून ३ लाख ५७ हजारांचा दंड वसूल आहे.
नागपुरात मास्क न लावणाऱ्या ६४९ नागरिकांकडून दंड वसूल
ठळक मुद्देमनपाची पाच दिवसात १७८५ लोकांवर कारवाई