शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
2
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
3
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
4
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
5
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
6
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
7
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
8
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
9
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
10
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
11
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
12
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
13
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
14
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश
15
31 जुलैपासून सुरू होणार 'या' कंपनीचा कार प्लांट, दर वर्षी बाहेर पडणार 1.50 लाख इलेक्ट्रिक कार!
16
'ऑपरेशन सिंदूर' अजून संपले नाही; CDS जनरल अनिल चौहान यांचे मोठे विधान
17
Sex Racket: फाइव्ह स्टार हॉटेल आणि हाय- प्रोफाइल विदेशी महिला; मुंबईतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश!
18
Shravan 2025: पौराणिक कथांच्या शेवटी 'साठा उत्तराची कहाणी... सुफळ संपूर्ण' असं का म्हणतात?
19
तुमच्या PF खात्यात पैसे नसले तरीही नॉमिनीला आता थेट ५०,००० मिळतील; EPFO ने 'हे' नियम बदलले
20
Walmik Karad : 'धनंजय मुंडेंना संपवून वाल्मिक कराडला पोटनिवडणूक घ्यायची होती'; बाळा बांगरांचा गंभीर आरोप

पावसाच्या सरीत रंगला नागपूर महोत्सव

By admin | Updated: February 29, 2016 02:35 IST

पावसाच्या सरी, मान्यवरांची उपस्थिती, मोहित चौहानचे हृदयस्पर्शी सूर अन् नागपूरकर रसिकांच्या उदंड उत्साहात रविवारी ‘नागपूर महोत्सवाचा’ थाटात प्रारंभ झाला.

बहारदार उद्घाटन सोहळा : भरगच्च उपस्थिती नागपूर : पावसाच्या सरी, मान्यवरांची उपस्थिती, मोहित चौहानचे हृदयस्पर्शी सूर अन् नागपूरकर रसिकांच्या उदंड उत्साहात रविवारी ‘नागपूर महोत्सवाचा’ थाटात प्रारंभ झाला. पावसाच्या साक्षीने मान्यवरांनी दीपप्रज्वलित केला अन् एकाएकी आलेला पाऊस आशीर्वाद देऊन निघून गेला. पुढे नागपूर महोत्सवाची रंगत आणखीनच चढत गेली आणि टाळ्यांचा पाऊस अखंड कोसळत राहिला.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून महोत्सवाचे उद्घाटन झाले. यावेळी महापौर प्रवीण दटके, उपमहापौर मुन्ना पोकुलवार, लोकमतच्या एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन खासदार विजय दर्डा, खा. कृपाल तुमाने, खा. अजय संचेती, आ. कृष्णा खोपडे, आ. सुधाकर कोहळे, आ. अनिल सोले, आ. प्रकाश गजभिये, आ. विकास कुंभारे, आ. नागो गाणार, आ. मिलिंद माने, आ. आशिष देशमुख, स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश सिंगारे, सत्तापक्षनेते दयाशंकर तिवारी, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष संदीप जोशी, भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार, आयुक्त श्रावण हर्डीकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते. या महोत्सवाचे संयोजन लोकमत समूहाने केले आहे. (विशेष पान २ वर)राज्य सरकारचा दरवर्षी  महोत्सवात सहभाग : मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, महापालिकेतर्फे नागपूर महोत्सवाच्या निमित्ताने एक मोठे पर्व आयोजित केले जात आहे. या महोत्सवासाठी महापौरांनी राज्य सरकारकडे मदतीची विनंती केली होती. ती मान्य करीत राज्य सरकार महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाच्या माध्यमातून या महोत्सवात सहभागी झाले आहे. यापुढे दरवर्षी राज्यसरकार या महोत्सवात सहभागी होईल, अशी घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. या महोत्सवाच्या माध्यमातून नागपूरची संस्कृती प्रदर्शित होत आहे. स्थानिक कलावंतांना वाव मिळतो आहे. सोबतच जागतिक पातळीवर असलेल्या प्रतिभा नागपूरकरांना पहावयास मिळत असल्याचे सांगून त्यांनी या आयोजनासाठी महापालिकेला शुभेच्छा दिल्या. गडकरींच्या शुभेच्छा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या महोत्सवाला शुभेच्छा दिल्या. चारही दिवस जनता या महोत्सवाला प्रतिसाद देईल, पाऊसही सहकार्य करेल, अशी अपेक्षा व्यक्त करीत या महोत्सवाच्या आयोजनासाठी त्यांनी महापौर व चमूला शुभेच्छा दिल्या.