शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
2
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
3
अहिल्यानगरमधील चोंडीतील मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली; नवी तारीख कोणती?
4
जम्मू- काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील दोघे जखमी
5
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
6
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
7
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
8
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
9
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
10
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
11
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
12
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
13
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
14
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
15
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
16
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
17
आदिवासी भागातून UPSC परीक्षेत यश मिळवणारे पहिलेच युवक; इंटरनेटवरील व्हिडीओद्वारे केला अभ्यास
18
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
19
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
20
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे

Nagpur: मतमोजणीच्या प्रत्येक शंकांचे तत्काळ निरसन व्हावे, जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

By आनंद डेकाटे | Updated: May 20, 2024 21:59 IST

Maharashtra Lok Sabha Election 2024: मतमोजणीतील कर्तव्य पार पाडताना सर्वांना विश्वासात घेऊन अधिक जबाबदारीने मतमोजणी व्हावी यावर प्रत्येक अधिकारी-कर्मचाऱ्यांनी भर दिला पाहिजे. मतमोजणीसाठी उपस्थित असलेल्या विविध उमेदवार प्रतिनिधींच्या मनात जर काही शंका असतील तर त्याचे तत्काळ निरसन झाले पाहिजे.

- आनंद डेकाटेनागपूर - मतमोजणीतील कर्तव्य पार पाडताना सर्वांना विश्वासात घेऊन अधिक जबाबदारीने मतमोजणी व्हावी यावर प्रत्येक अधिकारी-कर्मचाऱ्यांनी भर दिला पाहिजे. मतमोजणीसाठी उपस्थित असलेल्या विविध उमेदवार प्रतिनिधींच्या मनात जर काही शंका असतील तर त्याचे तत्काळ निरसन झाले पाहिजे. सकाळी ६ पासून ते मतमोजणी पूर्ण होईपर्यंत आपल्याला संयमाने काम करायचे आहे ही मानसिकता ठेवा, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले.रामटेक व नागपूर लोकसभा निवडणुकीची मतमेाजणी येत्या ४ जूनला कळमना मार्केट येथे होणार असून त्या दृष्टीने मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षण सत्रात ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे आयोजित या प्रशिक्षणास अप्पर जिल्हाधिकारी तथा रामटेक निवडणूक निर्णय अधिकारी तुषार ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रवीण महिरे, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, प्रशिक्षक सचिन कुमावत व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यापूर्वी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे ईव्हीएम हाताळण्याबाबतचे पहिले प्रशिक्षण देशपांडे सभागृहात पार पाडले आहे. आजच्या प्रशिक्षणात पोस्टल मतपत्रिका कशी उघडावी, मत कसे गणण्यात यावे याबाबत माहिती देण्यात आली.

पोस्टल बेलॅटच्या मोजणीसाठी १० टेबल४ जूनला सर्वसाधारण मोजणी व पोस्टल बेलॅटची मतमोजणी होणार आहे. पोस्टल मतपत्रिकेची मतमोजणी सर्वात अगोदर होणार आहे. ५०० बॅलेट पेपरसाठी एक टेबल असेल. यावर सहाय्यक निवडणूक अधिकारी-कर्मचारी नियुक्त केले आहेत. पोस्टल मतपत्रिकेसाठी १० टेबलवर १० अधिकारी राहणार आहेत. तर सर्वसाधारण मतमोजणीसाठी एक लोकसभा मतदारसंघाच्या मोजणीला एकूण १२० टेबल राहतील.

वैद्यकीय सुविधेवरही भरप्रशिक्षणात मतमोजणीसाठी करावयाची टेबलनिहाय रचना, माध्यम कक्ष, सुरक्षा व्यवस्था, सुरक्षा व्यवस्थेसाठी नियुक्त अधिकारी कर्मचारी, आपत्ती संबंधी नियंत्रण कक्ष, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी करावयाची पूर्वतयारी, भोजन व्यवस्था, मतमोजणी प्रक्रियेतील गोपनीयता याबाबत सादरीकरण करण्यात आले. या मतमोजणी प्रक्रियेतील अधिकारी कर्मचाऱ्यासाठी प्रथमोपचाराचे साहित्य व वैद्यकिय उपचार सुविधेबाबतही निर्देश देण्यात आले.

टॅग्स :Votingमतदानmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४nagpur-pcनागपूर