शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर दुर्गोत्सव सर्वांसाठी प्रेरणादायी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 00:52 IST

लक्ष्मीनगर येथे ‘लोकमत’ आणि राणी लक्ष्मीबाई दुर्गा उत्सव मंडळातर्फे आयोजित मध्य भारतातील सर्वात मोठ्या नागपूर दुर्गा महोत्सवाने धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक संगम साधला आहे. ज्या पद्धतीने हे आयोजन होत आहे,.....

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार यांचे गौरवोद्गार : रविवारी सुमारे लाख भाविकांनी दिली भेट

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लक्ष्मीनगर येथे ‘लोकमत’ आणि राणी लक्ष्मीबाई दुर्गा उत्सव मंडळातर्फे आयोजित मध्य भारतातील सर्वात मोठ्या नागपूर दुर्गा महोत्सवाने धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक संगम साधला आहे. ज्या पद्धतीने हे आयोजन होत आहे, त्यापासून इतर मंडळांनीदेखील आदर्श घेण्याची आवश्यकता आहे. सामाजिक जाणीव लाभलेल्या नागपूर दुर्गोत्सवाने सर्वांना प्रेरणा दिली आहे, असे गौरवोद्गार राज्याचे वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काढले.सोमवारी मुनगंटीवार, रामटेकचे खासदार कृपाल तुमाने तसेच पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम् यांनी लक्ष्मीनगर येथील व्हॉलिबॉल मैदानावर सुरू असलेल्या नागपूर दुर्गा महोत्सवाला भेट दिली. सायंकाळी ७ च्या सुमारास मान्यवर दुर्गोत्सवात पोहोचले. मेट्रो रेल्वेच्या प्रतिकृतीने ते प्रभावित झाले. मुख्य मंडपात गेल्यानंतर ते माता दुर्गेसमोर नतमस्तक झाले. त्यानंतर त्यांनी ‘क्रांतिकारी गॅलरी’ला भेट दिली. या गॅलरीत त्यांनी बराच वेळ क्रांतिकारकांच्या शौर्यगाथा, त्यांची दुर्मिळ छायाचित्रे व एकूण आयोजनाबाबत माहिती घेतली. कृपाल तुमाने तसेच के. व्यंकटेशम् यांनीदेखील आयोजनाचे भरभरून कौतुक केले. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष प्रसन्ना मोहिले यांनी मान्यवरांचे स्वागत केले.शाळांमध्ये पोहोचला पाहिजे जाज्वल्य इतिहासशक्तीचा उत्सव साजरा होत असताना दुर्गोत्सवाच्या माध्यमातून नवीन पिढीपर्यंत देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास पोहोचतो आहे, ही फार गौरवशाली बाब आहे. शाळांपर्यंत हा इतिहास पोहोचविण्याची आवश्यकता आहे. यासाठी मंडळाने तसेच ‘लोकमत’ने पुढाकार घ्यावा. राज्य शासन यासाठी खंबीरपणे पाठीशी उभे राहील, असे मुनगंटीवार यांनी यावेळी आश्वासन दिले.पहाटे ३.४५पर्यंत गर्दीदरम्यान, रविवारी नागपूर दुर्गोत्सवाला रेकॉर्डब्रेक गर्दी झाली. रविवारी दिवसभर गर्दी होतीच. मात्र रात्रीच्या सुमारास आणखी गर्दी वाढली. अगदी पहाटे ३.४५पर्यंत दर्शन घेणाºयांची रीघ होती. दिवसभरात सुमारे एक लाख नागरिकांनी दुर्गोत्सवाला भेट दिली. विशेष म्हणजे भेट देणाºयांमध्ये विदर्भासोबतच खान्देश, मराठवाडा, छत्तीसगड, मध्यप्रदेश येथील भाविकांचा समावेश होता. सोमवारी मोठ्या प्रमाणावर गर्दी होती व राज्याबाहेरील नागरिकांचीदेखील रीघ दिसून आली.आज दुर्गोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमनागपूर दुर्गोत्सवात मंगळवारी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ७ वाजता या कार्यक्रमाची सुरुवात होईल.