शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विभागात कॉपीचे प्रमाण घटले

By admin | Updated: June 14, 2017 01:15 IST

गेल्या सहा वर्षांपासून कॉपीमुक्त अभियान मंडळातर्फे राबविण्यात येत असून यामध्ये मंडळाला चांगलेच यश मिळत आहे.

८७ कॉपीबहाद्दर दोषी : गोंदिया जिल्ह्यात सर्वाधिक प्रकरणे लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : गेल्या सहा वर्षांपासून कॉपीमुक्त अभियान मंडळातर्फे राबविण्यात येत असून यामध्ये मंडळाला चांगलेच यश मिळत आहे. यंदादेखील शालांत परीक्षेत कॉपीला आळा बसल्याचे आढळून आले. नागपूर विभागामध्ये कॉपीची एकूण ८७ प्रकरणे आढळली असून यामध्ये सर्व विद्यार्थी दोषी आढळले आहेत. मागील वर्षी दोषींचा आकडा ११४ इतका होता. गोंदिया जिल्ह्यात सर्वाधिक ३२ कॉपीबहाद्दर दोषी आढळले. विशेषत: कॉपीसाठी कुप्रसिद्ध असलेल्या भंडारा जिल्ह्यात १८ प्रकरणे आढळून आली. गडचिरोली जिल्ह्यात सर्वात कमी दोन कॉपीबहाद्दर सापडले. विभागात कॉपीची संख्या दरवर्षी कमी होत आहे. कॉपीमुक्त अभियानावर आमचा जास्तीत जास्त भर आहे, अशी माहिती विभागीय मंडळ अध्यक्ष संजय गणोरकर यांनी दिली. परीक्षा झाल्यानंतर आढळली ४७ प्रकरणे दरम्यान, परीक्षा झाल्यानंतरच्या काळात गैरमार्गाचा अनेकांकडून अवलंब करण्यात येतो. विभागात अशी ४७ प्रकरणे आढळली व यातील सात जण दोषी ठरले. ३७ जणांना निर्दोष सोडण्यात आले तर तीन विद्यार्थ्यांचा निकाल राखीव ठेवण्यात आला आहे.